गणेशोत्सवानिमित्त प. पु. स्वामी गगनगिरी गणेशोत्सव नवरात्र महोत्सव मंडळाच्यावतीने गरजू कुटूंबियांना अन्नधान्याचे १५०० किटचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


गणेशोत्सवानिमित्त प. पु. स्वामी गगनगिरी गणेशोत्सव नवरात्र महोत्सव मंडळाच्यावतीने


गरजू कुटूंबियांना अन्नधान्याचे १५०० किटचे वाटप


गणेशोत्सवानिमित्त शुक्रवार पेठेतील प. पु. स्वामी गगनगिरी गणेशोत्सव नवरात्र महोत्सव मंडळाच्यावतीने गरजू कुटूंबियांना अन्नधान्याचे १५०० किटचे वाटप करण्यात आले .


मंडळाचे संस्थापक गणेशभक्त राजाभाऊ मोरे यांचे चिरंजीव रुपेश मोरे यांच्या शुभविवाहाचा खर्च कमी करून या समाज उपयोगी कार्यक्रमात करण्यात आला . कोरोनाचे संकट लक्षात घेऊन मंडळाने व मोरे कुटंबीयांनी हे कार्य तसेच पुढे चालू ठेवले . शुक्रवार पेठ व गुरुवार पेठ या भागातील गरजू लोकांना गरजू कुटूंबियांना अन्नधान्याचे किटचे वाटप करण्यात आले . तसेच , गरीब गरजू लोकांना रोज सकाळ व संध्याकाळ फूड पॅकेटचे वाटप करण्यात येत आहे .


या कार्यात मंडळाचे अध्यक्ष रितेश मोरे , राजाभाऊ वासुंडे , शिरीष निवंगुणे , तुषार खोपकर , मंगेश रानवडे , ओंकार उपाध्ये यांनी कार्य पार पाडले. या सामाजिक कार्यास मंडळाचे आधारस्तंभ रुपेश मोरे यांनी विशेष सहकार्य केले .