बँक ऑफ महाराष्ट्रकडून एमसीएलआर व सोने तारण कर्जावरील व्याज दरात कपात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


पुणे दिनांक 7 ऑगस्ट, 2020 : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक ऑफ महाराष्ट्र ने आपल्या “निधी आधारीत कर्ज व्याजदर (एमसीएलआर) कमी केलेला आहे. सलग पाचव्या महिन्यात बँकेने निधी आधारीत कर्ज व्याजदर (एमसीएलआर) कमी केलेला आहे


 


एक दिवसाच्या मुदतीसाठी 7.00% वरुन 6.80%, एक महिन्यासाठी 7.10% ऐवजी 6.90% आणि एक वर्षासाठी 7.50% ऐवजी 7.40% याप्रमाणे व्याजदरात कपात केली आहे.


 


आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळावी हा या दरकपातीमागील उद्देश्य आहे


 


त्याचप्रमाणे शेतकरी व किरकोळ ग्राहकांसाठीच्या सोने तारण कर्जावरील व्याजदरातही बँकेने कपात केली आहे. शेतक-यांना आता कृषि सुवर्ण कर्ज 1 वर्ष मुदतीच्या एमसीएलआर दराने म्हणजे 7.40% या दराने उपलब्ध होईल (7.80% ऐवजी). किरकोळ सुवर्ण कर्जावरील व्याजदर देखील 8.00% वरुन 7.50% इतका कमी केला आहे.


 


सध्याची कोविड साथीची परिस्थिति लक्षात घेऊन शेतकरी व किरकोळ ग्राहकांची मदत व्हावी म्हणून सोने तारण कर्जावरील व्याजदरात बँकेने कपात केली आहे.