सुर्यदत्ता एज्युकेशन फौंडेशनच्या वतीने कौशल्य विकासासाठी ‘रिसोर्स अँड असेट बँक’

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


पुणे : सुर्यदत्ता ग्रुपच्या एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत दिवंगत रत्नाबाई आणि बन्सीलाल चोरडिया यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने सुर्यदत्ता एज्युकेशन फौंडेशनच्या वतीने ‘असेट बँक’ उभारण्यात आल्या आहेत. सूर्यदत्ता स्कुल ऑफ इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंट अंतर्गत सुर्यदत्ता फुड बँक, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अंतर्गत सुर्यदत्ता क्लोदिंग बँक, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अंतर्गत सुर्यदत्ता प्रॉडक्ट्स बँक, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटर अंतर्गत सुर्यदत्ता नॉलेज बँक आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, सूर्यदत्ता इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी आणि सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी या संस्थांच्या अंतर्गत सूर्यदत्ता बिझनेस बँक अशा पाच बँकांचा यात समावेश आहे. या बँकांमार्फत अर्थात इन्स्टिट्यूटमार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. समाजातील गरजू, होतकरू, आर्थिक मागास वर्गातील लोकांना, शेतकर्‍यांना, सैन्यदलातील सदस्यांना, नोकरदारांना, दिव्यांग मुलांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती सुर्यदत्ता ग्रुपच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांनी दिली आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा सामाजिक उपक्रम सुरु होत आहे.


 


सुषमा चोरडिया म्हणाल्या, “सुर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या संकल्पनेतून या असेट बँकांची निर्मिती झाली आहे. कोअर टीममध्ये प्रा. डॉ. शैलेश कासंडे, डॉ. विजयालक्ष्मी, डॉ. शेफाली जोशी, उल्हास चौधरी, अजित शिंदे, मंदार दिवाने, रेणुका घोसपुरकर, मोनिका कर्वे, स्नेहल नवलाखा, डॉ. राम चंद्र आदींचा समावेश असणार आहे. सुर्यदत्ता फुड बँकेच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्था, रोजंदारीवरील मजूर, रस्त्यावर राहणारे नागरिक यांच्यासह गरजूंना अन्न पुरवले जाणार आहे. सुर्यदत्ताच्या पदाधिकाऱ्यांचे, संबंधितांचे जन्मदिवस, तसेच विविध महत्वपूर्ण दिवसांचे औचित्य साधून हे अन्नदान होणार आहे. तसेच गरजूना जीवनावश्यक साहित्य दिले जाणार आहे. क्लोदिंग बँकेमार्फत वापरायोग्य कपड्यांचे संकलन, तसेच नवीन कपडे घेऊन गरजू लोकांना पुरविण्यात येणार आहेत. आलेले कपडे स्वच्छ धुऊन, विद्यार्थी व शिक्षकांकडून त्याचे रफ़ू-अल्ट्रेशन करून ते वितरित केले जाणार आहेत. ज्यांना गरज आहे, अशा लोकांना या कपड्यांचे वाटप केले जाईल. नवीन आणि वापरलेले अशा दोन्ही प्रकारचे कपडे गरजूंपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. अनाथ आश्रम, महिला आश्रम, वृद्धाश्रमात राहणार्‍या गरजुंना याची मदत होणार आहे. नेहमीच्या वापरातील, उबदार कपडे आपण देऊ शकाल.”


 


“सुर्यदत्ता प्रॉडक्ट बंकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या पुनर्वापर होऊ शकेल, अशा उत्पादनांचे संकलन केले जाईल. त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून गरजूना ते दिले जाणार आहेत. तसेच शालेय साहित्य, जसे कि वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल्स, रबर, कंपास आदिंचा समावेश असेल. शिवाय, अवांतर वाचनाची पुस्तके आदी साहित्य समाजातील गरजू विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप केले जाणार आहे. सुर्यदत्ता नॉलेज बँकेमधून ज्ञानदानाचे कार्य होणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरुपात विविध गोष्टींचे ज्ञान दिले जाणार आहे. त्यामध्ये भारतीय संस्कृती मूल्ये, चालू घडामोडींची माहिती, प्रश्नोत्तरे, प्राथमिक शिक्षण अशा स्वरुपात हे ज्ञानदान होणार आहे. बिझनेस बँकेच्या माध्यमातून स्टार्टअप आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यास नवोद्योजकांना माहिती आणि इतर सहाय्य पुरवले जाणार आहे. स्टार्टअपसाठी प्रेरित करण्याचा उद्देश यामागे असून, सुर्यदत्ता परिवारातील प्राध्यापक, विद्यार्थी किंवा इतर कर्मचारी हे काम करतील. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळण्यासोबतच देशातील ‘एसएमई’ चालना मिळेल,” असेही चोरडिया यांनी नमूद केले. तसेच अधिक माहितीसाठी 9763266829 या क्रमांकावर किंवा sgiassetbk@suryadatta.edu.in या ईमेलवर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


मुलांमध्ये चांगले गुण रुजावेत. त्यांच्यात उद्योजकतेविषयी, करिअरविषयी नवीन कल्पना रुजाव्यात, उपलब्ध स्रोतांपासून नवीन ध्येये सध्या करावीत, या उद्देशाने हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. या बँक विद्यार्थ्यांसाठी रिसोर्सेसचा खजिना असेल, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याच्याशी आपल्याला जोडून घ्यावे, असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले. 


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान