राष्ट्रवादीकडून कोणाला मिळणार संधी

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


 *?* 


*विधान परिषदेच्या १८ जागा रिक्त; जिल्ह्यातून उमेश पाटलांचे नाव चर्चेत*


 


*सोलापूर, ता. ११ :-* राष्ट्रवादी युक्क काँग्रेसचा आजचा अध्यक्ष उद्याचा आमदार हा शिरस्ता राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सुरू केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक आणि राष्ट्रवादी महिला अध्यक्षांकडे भावी आमदार म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या युवक आणि महिला आघाडी मध्ये काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची नेहमीच चुरस बघायला मिळते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या जवळपास १८ जागा रिकाम्या झाल्या आहेत. त्यामुळे महिला आणि युवकाच्या कोणत्या आजी-माजी अध्यक्षाला संधी मिळणार? याकडे सर्व युवकांचे लक्ष लागले आहे 


राष्ट्रवादी युवकांचे प्रदेशाध्यक्ष काम केलेले जितेंद्र आव्हाड, 


रणजितसिंह मोहिते पाटील,निरंजन डावखरे यांना पक्षाने विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे.


तत्कालीन प्रदेशाध्यक्ष उदय सामंत यांच्याकडे आमदार असताना प्रदेशाध्यक्षपदाची जवाबदारी आल्याने त्यांना या पदाच्या माध्यमातून मंत्रीपदापर्यतचा प्रवास सुकर झाला आहे. 


आजपर्यत सर्व आजी माजी अध्यक्षांना विधिमंडळाचे सदस्य करण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केले आहेत. माजी अध्यक्षांच्या यादीतील या नावांमध्ये मात्र सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य व जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांना विधिमंडळाच्या सदस्यांत्वासाठी पक्षाने अद्यापही संधी दिली नाही.


विधान परिषदेच्या १८ जागा रिक्त झाल्याने, पुणे पदवीधर मतदारसंघातुन उमेश पाटील यांना संधी मिळेल असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करु लागले आहेत. 


पुणे पदवीधर मतदार संघात सध्या उमेश पाटील, अरुण लाड, श्रीमंत कोकाटे, सारंग पाटील यांच्या सह अन्य नावे चर्चेत आहेत. 


पाहुया पक्षाध्यक्ष शरद पवार कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात??? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 


पदवीधरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार आजपर्यंत होऊ शकला नाही. बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला घायाळ करणाऱ्या भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांचा राजकीय जन्म या मतदारसंघात झालेला आहे. सध्या पाटील विधानसभेत आहेत. या जागेवर पुन्हा भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपसोबत आमदार पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसची ताकद या मतदारसंघात मोठी आहे. तिन्ही महत्वाचे पक्ष सत्तेत असताना पुणे पदवीधर जागा खेचून आणणे राष्ट्रवादीसाठी राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्वाचे मानले


आहे.


त्यामुळे सध्या पुणे पदवीधर मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले खाते उघडेल आणि विधान परिषद आमदार म्हणून उमेश पाटील यांचे नाव वर्णी लागेल, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.