*एअर इंडियाच्या केरळ येथील विमान दुर्घटनेबद्दल* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले दु:ख*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


उपमुख्यमंत्री कार्यालय,


मंत्रालय, मुंबई 400032,


दि. 7 ऑगस्ट 2020


 


 


*एअर इंडियाच्या केरळ येथील विमान दुर्घटनेबद्दल*


*उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले दु:ख*


           मुंबई, दि. 7 :- केरळच्या कोझीकोड इथं करीपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याचे समजून धक्का बसला. ही घटना अत्यंत दुर्दैवी, दु:खद असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघातात मृत्यू पावलेले वैमानिक, कर्मचारी व प्रवाश्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अपघातातील जखमी प्रवाशांना वैद्यकीय मदत मिळून ते लवकरच पूर्ण बरे होतील, त्यांनी लवकर बरं व्हावं, यासाठी मी प्रार्थना करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


               उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, या अपघातात मुंबईचे वैमानिक दीपक वसंत साठे यांचंही निधन झाल्याचं समजलं. हवाई दलासाठी सेवा बजावलेल्या या कुशल वैमानिकाचा मृत्यू दु:खदायक आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. आम्ही सर्वच त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. केरळ सरकार आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या तत्पर बचाव आणि मदत कार्यामुळे व वेळीच उपचारांमुळे अधिकधिक जखमी प्रवाशांचे जीव वाचवण्यात यश मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


०००००००.