एआय-सक्षम परदेशी शिक्षण मंच ‘अॅडवॉय’ भारतात लाँच

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


~ प्रत्येक विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील ~


 


मुंबई, १४ ऑगस्ट २०२०: ब्रिटनमधील एआय-सक्षम परदेशी शिक्षण मंच अॅडवॉयने भारतात लाँचिंगची घोषणा केली. आयईसी अब्रॉडने याची निर्मिती केली आहे. अॅडवॉय हा एक फ्री-ऑनलाइन मंच असून तो युनिव्हर्सिटी अॅप्लिकेशन्ससह भावी विद्यार्थ्यांना निष्पक्ष सल्ला, सामग्री आणि मदत प्रदान करतो.


 


अॅडवॉय एक डिजिटल मंच असून तो विद्यार्थ्यांना संशोधनासाठी टेक्नोलॉजी आणि रिअल-लाइफ मार्गदर्शक असे दोन्ही उपलब्ध करून देतो. अर्जप्रक्रियेसह, अॅडवॉय विद्यार्थ्यांना निवास, वैद्यकीय विमा आणि विद्यापीठात पोहोचण्यासाठीही मार्गदर्शन करेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर करत विद्यार्थ्यांना एकाच जागेवरून ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, आयर्लंड आणि जगातील इतर अनेक देशांतील विद्यापीठांमध्ये अर्ज करण्याची संधी देऊन अर्जप्रक्रिया सुलभ बनवतो.


 


अॅडवॉयचे संस्थापक आणि सीईओ सादिक बाशा म्हणाले, “ अॅडवॉय लाँच करणे हा माझ्या महत्त्वाकांक्षेतील एक मोठा मैलाचा दगड आहे. परदेशात शिकण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची गरज आम्ही जाणतो. अॅडवॉला टेक्नोलॉजीच्या माध्यमातून शैक्षणिक जग सुलभ बनवणे, विद्यार्थ्यांना समर्थ बनवणे, विदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षणाती योजना आखणे आणि त्यांच्या प्रवासादरम्यान आणखी चांगले निर्णय घेण्यासाठी लाँच करण्यात आले आहे. हा स्ट्रीमलाइन प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना भावी विद्यार्थ्यांना जगभरातील शिक्षण प्रदात्यांशी जोडले जाण्यास मदत करतो. जेणेकरून त्यांना कोर्स शोधणे आणि त्यासाठी अर्ज करण्यात व्यावसायिक सल्ला मिळू शकेल. आमच्या मते, जागतिक स्तरावरील विदेशी शिक्षण ही अशी गोष्ट आहे, जिथपर्यंत प्रत्येकाला पोहोचता आले पाहिजे. अॅडवॉयच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचे विदेशात शिक्षणाचे स्वप्न साकार करू इच्छितो.”


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image