नारळी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात कल्पवृक्षाची साधेपणाने सजावट-

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



बुधवार पेठेतील कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ; लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने भक्तांनी घेतले बाहेरुन दर्शन ; पार पडले धार्मिक विधी


 


पुणे : नारळी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात शहाळ्यांच्या नारळांची आरास साधेपणाने करण्यात आली. नारळाचे झाड हे कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मंदिरात हे कल्पवृक्ष अत्यंत साधेपणाने सजावटीतून साकारण्यात आले. लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने भक्तांनी बाहेरुनच दर्शन घेतले, तसेच मंदिरात केवळ धार्मिक विधी पार पडले. 


 


यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते यांसह कर्मचारी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून उपस्थित होते. ट्रस्टचे यंदा १२३ वे वर्ष आहे. मंदिरात दत्तयाग संजय दरक व अनुपमा दरक यांच्या हस्ते पार पडला. 


 


ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, दरवर्षी कल्पवृक्षाच्या माध्यमातून शहाळ्यांची आरास केली जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने केवळ धार्मिक विधी पार पडले. तसेच अत्यंत साधेपणाने कल्पवृक्ष लावून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली.


 


* फोटो ओळ : नारळी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात शहाळ्यांच्या नारळांची आरास साधेपणाने करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भाविकांनी बाहेरुन दर्शन घेतले.