शिवसंग्रामच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन शिवसंग्राम पुणे शहर : जन्मशताब्दी निमित्त पुष्पहार अर्पण 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



 


पुणे : शिवसंग्राम पुणे शहराच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या सारसबागेसमोरील पुतळ््याला हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसंग्राम सामाजिक न्याय विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण ओहोळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहराध्यक्ष भरत लगड, प्रदेश सचिव शेखर पवार, प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, महिला शहराध्यक्षा कालिंदी गोडांबे, सरचिटणीस सचिन दरेकर, समीर निकम, संजय लोंढे, उर्मिला गायकवाड, महेंद्र कडू आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरीता शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केंद्र सरकारकडे सर्वप्रथम शिफारस केली होती. अण्णा भाऊ साठे यांची साहित्य क्षेत्रातील भरीव कामगिरी आणि जनमानसातील स्थान लक्षात घेता महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज आणि समस्त बहुजन समाजाच्या मनातील त्यांच्या विषयीच्या आस्थेचा गौरव करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 


 


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज करीत आहे. 


 


* फोटो ओळ : शिवसंग्राम पुणे शहराच्या वतीने सारसबागेसमोरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या पुतळ््याला हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसंग्राम सामाजिक न्याय विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण ओहोळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.