पुणे प्रवाह न्युज पोर्टल
खडकवासला धरणाचे 'जलपूजन' !
खडकवासला साखळी धरण प्रकल्पाच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळे संपूर्ण प्रकल्पातील पाणीसाठा ७० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पूर्णपणे मिटला आहे. याचंच औचित्य साधत आज खडकवासला धरणात मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार श्री. भिमरावजी तापकीर,उपमहापौर सौ.सरस्वतीताई शेंडगे,काँग्रेसचे गटनेते श्री.आबा बागुल, नगरसेवक श्री.अजय खेडेकर,हरीदास चरवड,जयंत भावे,धनराज घोगरे,नगरसेविका सौ.मंजुश्री खर्डेकर,स्मिता वस्ते,राजश्री नवले,निता दांगट,अश्विनी पोकळे,तसेच महापालिका व पाटबंधारे विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.