पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लोकशाहिर अण्णाभाऊ
साठे आणि लोकमान्य टिळक यांना अभिवादन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
जन्म शताब्दी व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त
जयकर ग्रंथालयातील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आणि लोकमान्य
टिळक यांच्या अर्धपुतळयास कुलगुरु डॉ. नितिन करमळकर यांच्या हस्ते पुष्पहार
अर्पण करण्यात आले. याप्रसंगी जयकर ग्रंथालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
करण्यात आले. याप्रसंगी प्र - कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ.
प्रफुल्ल पवार, अधिष्ठाते डॉ. काळकर, डॉ. चासकर, अण्णाभाऊ साठे अध्यासन
प्रमुख डॉ. सुनिल भंडगे, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. लोंढे, डॉ.
बनसोडे, मातंग विकास संस्थेचे संस्थापक राजेश राजगे, माऊली बोजवारे आदी
मान्यवर उपस्थित होते.