आठवड्याची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स १४१ अंकांनी वधारला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


आठवड्याची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स १४१ अंकांनी वधारला


 


मुंबई, १० ऑगस्ट २०२०: भारतीय निर्देशांकांनी सलग तिस-या दिवशी मागील नफ्याची पातळी ओलांडत सकारात्क स्थिती गाठली. आजचा नफा बहुतांशरित्या फार्मा सेक्टरच्या नेतृत्वाखाली झाला. निफ्टी ०.५०% किंवा ५६.१० अंकांनी वाढून ११,२७० अंकांवर बंद झाला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.३७% किंवा १४१.५१ अंकांनी वाढला व ३८,१८२.०८ वर थांबला.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात १७२३ शेअर्सनी नफा कमावला, १६६ शेअर्स स्थिर राहिले तर ९९६ शेअर्सनी घट अनुभवली. सिप्ला (९.४८%). एलअँडटी (४.८४%), एमअँडएम (४.९०%), टाटा मोटर्स (३.७५%) आणि सन फार्मा (३.४५%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर आयशर मोटर्स (२.१९%), एशियन पेंट्स (१.३%), मारुती सुझुकी (१.२०%), बीपीसीआय (१.१७%) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (१.१६%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आज फार्मा, आयटी, एफएमसीजी, बँक आणि ऑटो क्षेत्रासह सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात स्थिरावले. बीएसई स्मॉलकॅप १.४७% नी वाढला तर बीएसई मिडकॅप १.४२% नी वधारला.


 


आयपीसीए लॅबोरेटरीज: कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २४५% ची मजबूत वाढ दर्शवली. तसेच कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल ४२% नी वाढला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ७.२५% नी वाढले व त्यांनी २,०९८ रुपयांवर व्यापार केला.


 


कोचिन शिपयार्ड लिमिटेड: कंपनीने २०२१ या वर्षातील पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ६५% ची घट दर्शवली. तरीही कंपनीचे स्टॉक्स ३.६०% नी वाढले व त्यांनी ३४३.८० रुपयांवर व्यापार केला. कंपनीचा या काळातील महसूल ५५% नी वाढला.


 


महिंद्रा अँड महिंद्रा: कंपनीच्या २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहितील ट्रॅक्टर बिझनेसमधील उत्पन्न चांगल्या स्थितीत झाले. परिणामी आजच्या व्यापारी सत्रात कंपनीचे स्टॉक्स ४.९०% नी वाढले व त्यांनी ६२९.९० रुपयांवर व्यापार केला.


 


सिप्ला लिमिटेड: २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीने अपेक्षेपेक्षा मजबूत उत्पन्न झाल्याचे नोंदवले. कंपनीचा जून २०२० च्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा २६.६% झाला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ९.४८% नी वाढले व त्यांनी ७९७.७० रुपयांवर व्यापार केला.


 


इमामी लिमिटेड: कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहितील निव्वळ नफा १.१७% नी वाढला. तसेच ऑपरेशन्समधील महसूल २५.७९% नी घसरला. कंपनीचे स्टॉक्स २०% नी घसरले व त्यांनी ३०८.७५ रुपयांवर व्यापार केला.


 


भारतीय रुपया: आजच्या व्यापारी सत्रात देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी दिसून आल्याने रुपया सकारात्मक स्थितीत होता. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७४.८९ रुपयांचे मूल्य कमावले.


 


जागतिक बाजार: आजच्या सत्रात युरोपियन बाजारात खरेदी दिसून आल्याने सकारात्मक व्यापार झाला. एफटीएसई १०० ने ०.५३% ची वृद्धी घेतली तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.५६% नी वाढले. तथापि आशियाई बाजारात आजच्या व्यापारी सत्रात नकारात्मक स्थिती दिसून आली. नॅसडॅकने ०.८७% ची घसरण, निक्केई २२५ ने ०.३९% ची घसरण अनु‌भवली. तसेच हँगसेंगनेही ०.६३% ची घसरण घेतली


 


 


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image