गणेशमुर्त्यांच्या स्टॉलवरील अतिक्रमण विभागाच्या  कारवाई आणि आपल्या भूमिकेविरोधात श्रीच्या  मूर्तीसह आंदोलन 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रति. 


मा. श्री. मुरलीधर मोहोळ 


महापौर, पुणे 


विषय : गणेशमुर्त्यांच्या स्टॉलवरील अतिक्रमण विभागाच्या  कारवाई आणि आपल्या भूमिकेविरोधात श्रीच्या  मूर्तीसह आंदोलन 


महोदय, 


गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे आपल्या आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी हा उत्सव साध्यापद्धतीने साजरा करण्याला संमती दिली आहे. तसेच श्रीच्या विसर्जनाबाबतही आपल्या भूमिकेला पुणेकरांनी मूक संमती दिली आहे. वास्तविक त्यावर अनेक पुणेकरांच्या भूमिका या संतप्त आहेत, त्या यासाठीच कि , कोणतेही नियोजन न करता अचानक घोषणा करायच्या आणि त्या लादण्यासाठी होणाऱ्या कृतीलाच  पुणेकरांचा आक्षेप आहे.त्यात  नियोजनपूर्वक कोणतेही कार्य न केल्याचा फटका आता तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवासाठी श्रीच्या मूर्तीची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना बसला आहे. आज  गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला अचानक मुर्त्यांच्या स्टॉलवर आपल्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. ज्यांनी  ही  कारवाई केली, त्यांनी यापूर्वीही 5 वर्षांपूर्वी  अशीच कारवाई केली होती. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला होता. आज पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती होत आहे. अचानक स्टॉल वर कारवाई कशी केली जाते ? जे धोरण तुम्ही मांडले, ते एक महिनाआधी का नाही सुचले ? हे महत्वाचे प्रश्न आहेत. गणेश मूर्तीच्या  स्टॉलवर अचानक कारवाई केल्याने व्यवसायिकांसह ज्या नागरिकांनी मूर्तीची नोंदणी केली आहे,त्यांचे काय ?    यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातही महत्वाचे म्हणजे एकीकडे आपण सामाजिक अंतर राखा यासाठी जनजागृती करत आहात आणि आपणच त्याचा कसा फज्जा उडवता हेही या टांगेवाली कॉलनीतील मुर्त्यांच्या स्टॉलवर आपल्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि पोलीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईमुळे अधोरेखित झाले आहे. वास्तविक आपण कोणतेही नियोजन न करता, एक महिन्यापूर्वी पॉलिसी न आणता अशारितीने दोन दिवसापुर्वी नोटिसा देऊन अचानक केलेल्या कारवाईमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या  कारवाईच्या ,भोंगळ कारभाराविरोधात आम्ही श्रीच्या मुर्तीसह आंदोलन करणार आहोत. आपण कारवाई शिथिल करून विक्रेत्यांसह पुणेकरांना दिलासा दयावा ही  नम्र विनंती. 


कळावे 


आपला


श्री. अमित आबा बागुल 


सरचिटणीस , पुणे शहर जिल्हा काँग्रेस  


प्रत : 


मा. श्री. विक्रम कुमार 


आयुक्त,


पुणे महानगरपालिका