मित्रोंची ५ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



मुंबई, १८ ऑगस्ट २०२०: मित्रों या स्वदेशी शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपने नेक्सस व्हेंचर पार्टनर्सच्या नेतृत्वात ५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी केली आहे. या ताज्या फेरीत ३वन४ कॅपिटल आणि लेट्स व्हेंचरवरील अरुण तडंकी यांचे खासगी सिंडिकेटदेखील सहभागी होते. मित्रों अॅप हे एक शॉर्ट-फॉर्म सोशल व्हिडिओ अॅप असून ते यूझर्सना मनोरंजक शॉर्ट व्हिडिओ तयार करणे, अपलोड करणे, पाहणे आणि शेअर करण्याची सुविधा पुरवते.


 


ग्राहकांची गुंतवणूक वाढवणे तसेच उच्च गुणवत्तेची प्रतिभा मिळवण्यासाठी तसेच उत्पादन विकासास गती देण्यासाठी नव्या भांडवलाचा वापर कंपनी करेल. अॅपवर भारतातील प्रतिभावान निर्मात्यांचे विस्तृत नेटवर्क मिळवण्याची तसेच मित्रों ब्रँड तयार करण्यासाठी गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे.


 


निधीच्या ताज्या फेरीत मेकमाय ट्रिपचे अध्यक्ष दीप कालरा, पाइन लॅब्जचे सीईओ अमरीश राऊ, ज्युपिटरचे संस्थापक जितेन गुप्ता, (एमडी, स्पॉटिफाय इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमरजित बत्रा, फेसबुक आणि स्नॅपडीलचे माजी एक्झिक्युटिव्ह आनंद चंद्रशेखरन, गूगल क्लाऊड, इंडियाचे एमडी करण बाजवा, शॉपक्लेक्सचे सह संस्थापक राधिका घई आणि लेट्सव्हेंचरचे संस्थापक शांती मोहन यांनी सहभाग नोंदवला.


 


मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल म्हणाले, “ या प्रवासात नेक्सस व्हेंचर पार्टनर सहभागी झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या पोर्टफोलिओ कंपन्यांना उत्तम उत्पादने निर्मितीत मदत करण्याचे सूक्ष्म कौशल्य आहे. डिजिटल एंटरटेनमेंट आणि एंगेजमेंटची नवी कल्पना करत, भारतीय यूझर्ससाठी मित्रोंला जागतिक दर्जाचे उत्पादन बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्ले स्टोअरवर दर महिन्याला ३३ दशलक्ष डाउनलोड्स आणि ९ अब्ज व्हिडिओ व्ह्यूज मिळवणारे मित्रों हे भारतीय शॉर्ट फॉर्म व्हिडिओसाठी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. मित्रोंवरील प्रेमासाठी आम्ही यूझर्सचे आभारी आहोत.


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image