केंद्र शासनामार्फत नागरी भागातील स्वच्छताविषयक* *कामांच्या सर्वेक्षण 2020 चा निकाल जाहीर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*केंद्र शासनामार्फत नागरी भागातील स्वच्छताविषयक*


*कामांच्या सर्वेक्षण 2020 चा निकाल जाहीर*


 


  पुणे दि. 21:-केंद्र शासनामार्फत नागरी भागातील स्वच्छताविषयक कामांचे सर्वेक्षण 2020 चा निकाल 20 ऑगस्ट रोजी जाहीर झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांनी दिली.


   पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेचा देशात दुसरा व लोणावळा नगरपरिषदेचा देशात तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच जेजुरी नगरपरिषदेचा सहावा तर इंदापूर नगरपरिषदेचा 14 वा क्रमांक व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड चा 8 वा क्रमांक प्राप्त झाला आहे. 


  वरील पुरस्कार प्राप्त सासवड व लोणावळा नगरपरिषद यांना केंद्रीय नगरविकास मंत्री हरमनप्रीत कौर यांचे हस्ते मंत्रालय, मुंबई येथे व इंदापूर नगरपरिषद, जेजुरी नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोंमेंट बोर्ड यांना जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दूरचित्र संवादाच्या माध्यमातून पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, नगर विकास विभागाच्या तत्कालीन प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर हे मंत्रालय स्तरावर तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,देहू कॅन्टोंन्मेंटचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरीतवाल, इंदापूरच्या नगराध्यक्षा श्रीमती अंकिता शहा, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, जेजुरी नगराध्यक्षा श्रीमती विणा हेमंत सोनवणे, मुख्याधिकारी श्रीमती पुनम कदम, जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे, न.पा. प्रशासन सहा.संचालक रामनिवास झंवर, विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित होते.


   अमृत सिटी शहरांतर्गत पुणे महानगरपालिकेचा लोकसंख्यानिहाय वर्गीकरनात देशात 15 वा तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा 24 वा क्रमांक आला आहे. मंत्रालय स्तरावर वितरीत पुरस्कारासाठी सासवड नगराध्यक्ष मुख्याधिकारी मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी विनोद जळक व लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तत्कालीन मुख्याधिकारी सचिन पवार उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट विभागात देशात देहूरोड 8वा, खडकी 12वा तर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा 25 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.


  पुणे जिल्ह्यातील इतर न.प.चा पश्चिम विभागीय झोननिहाय निकाल जाहीर झाला असून लोकसंख्यानिहाय वर्गीकरणानुसार पश्चिम विभागात तळेगाव दाभाडे न.प. 8 वा, शिरूर 16, जुन्नर 22, चाकण 32, भोर 33, बारामती 42, आळंदी 46, दौंड 52, राजगुरूनगर 219 क्रमांक मिळाला आहे. तसेच पश्चिम विभागीय झोनमध्ये इंदापूर व जेजुरी नगरपरिषदेस विशेष पारितोषिक प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये केलेल्या कामगिरिबद्दल पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे, असे जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


0000