माईर्स एमआयटीच्या श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयचा 100 टक्के निकाल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  


पुणे, दि.१ ऑगस्ट - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्र अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशनल रिसर्च, पुणे संचालित श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय (मराठी माध्यम) ने 100 % निकालाने उत्तम कामगिरी करत यशाची कमान कायम राखली आहे. या वर्षी 237 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये 90 पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे 35 विद्यार्थी, 75 ते 90 पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे 100 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच प्रथम श्रेणी मध्ये 85 विद्यार्थी व द्वितीय श्रेणी प्राप्त करणारे 17 विद्यार्थी आहेत.


माईर्स एमआयटीच्या श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात प्रथम-नील अजित पाटील व यश विलास पानसरे (97.40%), द्वितीय- निलेश रमेश पाखरे व साक्षी नितीन खैरे (96.00%) आणि तृतीय- ओम कल्याण तांबडे (95.80%) या प्रमाणे विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहे.


माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. त्याच प्र्माणे भावी वाटचालीबद्दल सर्व विद्यार्थांना शुभेच्छा दिले.


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image