लॉकडाऊनमुळे वकिलावर भाजी विकण्याची वेळ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


लॉकडाऊनमुळे वकिलावर भाजी विकण्याची वेळ


 


मुंबई :  मुंबई मॅजिस्ट्रेट कोर्टातील


एका वकीलावर उपजीविकेसाठी भाजी विकण्याची वेळ आली आहे. पाच महिन्यांपूर्वी कोर्टात याचिका दाखल करण्यात व्यस्त असलेल्या या वकीलांना उदरनिर्वाहासाठी वसईतील गल्लीमध्ये भाजी विकावी लागेल, असे स्वप्नातही वाटले नसेल.


 


कोर्टाचे कामकाज अंशतः सुरू आहे. वकिलांचे उत्पन्नाचे साधन प्रचंड घटले आहे. अशा बिकट परिस्थितीत सहा जणांच्या कुटुंबाला पोसण्यासाठी भाजी विक्री शिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही. उपसमारीपासून करणाऱ्या इतर वकिलांकडूनही दुसरी अशाच प्रकारे विविध व्यवसाय सुरू त्या करण्यात आले आहेत. काहींनी तर वाहन चालकांचे काम पत्करले असून काही वकिल डिलिव्हरी बॉईजचे काम करत असल्याची माहिती आहे.


 


वकिली व्यवसाय करत असताना दुसरा व्यवसाय करण्याची परवानगी कायदा देत नाही. कोरोनामुळे सध्या प्रपंच चालवणे अवघड होऊन बसले असल्याने वकील काय वा सर्व सामान्य नागरिकांनाच्या कुटुंबावर ही उपासमारीची वेळ आली आहे.