वाहन आणि बँकिंग क्षेत्रात घसरण; सेन्सेक्स ४०० अंकांनी गडगडला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


मुंबई, १४ ऑगस्ट २०२०: वाहन आणि बँकिंग क्षेत्राने घसरण घेतल्याने आज बेंचमार्क निर्देशांकांनी घट दर्शवली. निफ्टी १.०८% किंवा १२२.०५ अंकांनी घसरला व ११,२०० पातळीखाली ११,१७८.४० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सनेही घसरण अनुभवली. सेन्सेक्समध्ये १.१३% किंवा ४३३.१५ अंकांची घट होऊन तो ३७,८७७.३४ अंकांवर थांबला.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात जवळपास १६०० शेअर्स घसरले, १०८५ शेअर्सना लाभ झाला तर १३३ शेअर्स स्थिर राहिले. आयशर मोटर्स (७.१५%), टाटा मोटर्स (४.८०%), एमअँडएम (३.२७%), बजाज फायनान्स (२.५९%) आणि अॅक्सिस बँक (२.६३%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. तर जेएसडब्ल्यू स्टील (२.५७%), कोल इंडिया (२.३३%), सन फार्मा (१.९७%), सिपला (१.७६%) आणि एनटीपीसी (१.५५%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. मेटल आणि फार्मा वगळता सर्व क्षेत्रांनी लाल रंगात व्यापार केला. बीएसई मिडकॅप १.०२% नी तर बीएसई स्मॉलकॅप ०.६१% नी घसरला.


 


एनटीपीसी लिमिटेड: कंपनीचा २०२१या वित्तवर्षातील पहिल्या तिमाहितील निव्वळ नफा ५.९% नी घसरला तर कंपनीचा महसूलही २.६% नी घटला. तरीही कंपनीचे स्टॉक्स १.५५% नी वाढले व त्यांनी ८८.६० रुपयांवर व्यापार केला.


 


नेस्को लिमिटेड: कंपनीचा २०२१ या वित्त वर्षातील पहिल्या तिमाहितील एकत्रित निव्वळ नफा ३५% नी वाढला तर महसूल ११ टक्क्यांनी घटला. तरीही कंपनीचे स्टॉक्स ४.५०% नी वाढले व्तयांनी ५१६.०५ रुपयांवर व्यापार केला.


 


सिटी युनियन बँक लिमिटेड: बँकेचे स्टॉक्स ३.८१% नी वाढले व त्यांनी १२१.२५ रुपयांवर व्यापार केला. जूनमध्ये संपलेल्या तिमाहित चांगली कामगिरी केल्याच्या वृत्तानंतर हे परिणाम दिसले. २०२१ या वित्तवर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १६.९% नी वाढला तर निव्वळ व्याज उत्पन्न ४.८% नी वाढले.


 


बीपीसीएल लिमिटेड: कंपनीच्या कामकाजातील महसुलात २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत ४३.८ % ची घट झाली. तर या काळात निव्वळ नफा २,०७६ कोटी रुपये झाला. कंपनीचे स्टॉक्स १.९८% नी घसरले व त्यांनी ४१२.८० रुपयांवर व्यापार केला.


 


हिरो मोटोकॉर्प: २०२१ या वित्तवर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीने कमकुवत कामगिरी दर्शवली. कंपनीचा निव्वळ नफा ९५.१% नी घसरला तर कामकाजातील महसुलात ६३३% ची घट झाली. कंपनीचे स्टॉक्स ०.४९% असे काही प्रमाणात घसरले व त्यांनी २,७९६.०० रुपयांवर व्यापार केला.


 


भारतीय रुपया: अस्थिर इक्विटी मार्केटच्या स्थितीत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ७४.९० रुपयांचे मूल्य अनुभवले.


 


जागतिक बाजार: आशियाई बाजाराने संमिश्र व्यापार केला तर युरोपियन मार्केटने आजच्या व्यापारी सत्रात घसरण अनुभवली. नॅसडॅक आणि निक्केई २२५ ने अनुक्रमे ०.२७% व ०.१७% ची वृद्धी घेतली तर हँगसेंगमध्ये ०.१९% ची घसरण झाली. तर दुसरीकडे एफटीएसई १०० मध्ये १.८०% ची घट झाली तर एफटीएसई एमआयबीमध्ये १.४८% ची घसरण झाली.


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान