पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात जून अखेर तीन हजार रुग्ण होती असा संकेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केलेले भाकीत खरे ठरले होते. नुकत्याच आयुक्तांनी 15 ऑगस्ट पर्यंत शहरात ५० हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या होईल नव्याने भाकीत केले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी चिंतेचेेे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे सत्ताधारी भाजप पक्षाकडून आयुक्तांंवर अविश्वास दाखवत अनेक कामांच्या चौकशीची मागणी केल्याने सत्ताधारी पक्ष व प्रशासन यांच्यात ताळमेळ नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासन व सत्ताधार्यांच्या संघर्ष शहरातील कोरोना परिस्थितीत सामान्य पिंपरी-चिंचवडकरांचे डोकेदुखी वाढणारी आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचेे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे.
वाघेरे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आगामी काळात शहरात कोरोना परिस्थिती कशा पद्धतीने वाढणार आहे याचा अंदाज येत असतो. मात्र त्या तुलनेत शहरातील उपचारांची पद्धत व त्यासाठी लागणारे करून टाइम सेंटर हॉस्पिटल उपचार पद्धती ऑक्सिजन व्हेंटिलेटर आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी का प्रयत्न केले जात नाहीत महापालिका सभेत आयुक्त सांगतात त्यावेळी सत्ताधारी पक्षाने नेहमीप्रमाणे एक हाती सत्ता असूनही या सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश तातडीने का देत नाही या गळचेपी धोरणामुळे शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.
अनेक कामात प्रशासन व सत्ताधारी यांच्यात तू तू मै मै होतेय....
मास्क पुरवठा असो की साबण, सॅनिटायझर पुरवठा असो, तसेच वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला. नुकताच वायसीएम मध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींनी डॉक्टरांना शिवीगाळ केली. अनेक नगरसेवकांनी सत्ताधारी भाजप विरोधात भ्रष्टाचाराची उघड उघड विरोधात भूमिका घेतली आहे. यामध्ये सत्तेतील भाजपच्या दोन्ही कारभार्यापैकी एक जण विरोध करणाऱ्या नगरसेवकांना सेटिंग करत आहे. तर दुसरा कारभारी आयुक्तांविरोधात चौकशीची मोहीम उघडून कोरोना परिस्थितीत सत्ताधारी अपयशाचे खापर आयुक्त श्रावण हर्डीकर व प्रशासनावर फोडण्याचे केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
शहरात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा कमी पडू लागली आहे त्यामुळे शहरात मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाकडून याची वेळेत दखल घेतली असती तर शहरात एवढी भयानक परिस्थिती वाढलीच नसती आता वाढत्या मृत्यू संख्येल जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला.