विराट कोहली चे कर्णधार धोक्यात??????

पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*


 


*नवी दिल्ली :-* भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असून तो कॉर्नरस्टोन वेंचर पार्टनर्स एलएलपी व विराट कोहली स्पोर्ट्स एलएलपी या कंपन्यांचा डायरेक्टर आहे. याच कंपन्यांचा को डायरेक्टर असलेला बंटी सजदेह हा कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमीटेडचा भाग आहे.


 


यातील कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमीटेड कंपनी भारतातील अनेक खेळाडूंचे टॅंलेंट मॅनेजमेंट पाहते. टॅलेंट मॅनेजमेंट म्हणजेच त्यांच्या आर्थिक बाजू पाहणे व इतर व्यवस्थापन करणे होय.


 


केएल राहुल, रिषभ पंत, रविंद्र जडेजा किंवा उमेश यादवसारख्या अनेक क्रिकेटर व इतर खेळाडंचे टॅलेंट मॅनेजमेंट या कंपनीकडून पाहिले जाते. विराट जरी या कंपनीचा भाग नसला तरी विराटचे कॉर्नरस्टोन वेंचर पार्टनर्स एलएलपीमधील को डायरेक्टर मात्र याचे भाग आहे. तसेच तो भारतीय संघाचाही कर्णधार आहे.


 


लोढा कमिटीने घालून दिलेल्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडू अथवा बीसीसीआयशी निगडीत व्यक्तीचे उत्पन्नाचे दोन किंवा अधिक स्त्रोत थोडक्यात परस्पर हितसंबंध (conflict of interest) हे क्रिकेटमधून येणारे नसावे तसेच अशा संस्थांशी निगडीत दोन पदांवर तो व्यक्ती काम करु शकत नाही.


 


यापुर्वीच याच गुप्तांकडून परस्पर हितसंबंधाबद्दल (conflict of interest) सौरव गांगुली, व्हिव्हिएस लक्ष्मण व कपिल देव यांच्याबद्दल तक्रारी करण्यात आल्या होत्या. याचमुळे सौरव गांगुली, व्हिव्हिएस लक्ष्मण व कपिल देव एका पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


 


गांगुलीने लोढा कमिटीने आखून दिलेल्या या नियमाबद्दल आधीच नाराजी व्यक्त केली होती. परंतू आता गांगुलीच बीसीसीआयचा अध्यक्ष आहे.


 


आता जर बीसीसीआयच्या तथ्य समितीपुढे विराटचे परस्पर हितसंबंध सिद्ध झाले तर विराटला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो.


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image