महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी कसबा विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. १५च्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


पुणे :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी कसबा विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. १५ च्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सदाशिव पेठमध्ये गिरीधर पारिजात सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा स्वाती पोकळे , महापालिका विरोधी पक्षनेत्या व नगरसेविका दीपाली धुमाळ व नगरसेवक बाबा धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते .


 


या रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी कसबा विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. १५ च्या अध्यक्षा ऍड. मोनिका धनंजय खलाणे यांनी केले होते . या रक्तदान शिबिरासाठी श्री आनंद ऋषीजी ब्लड बँकेच्या वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले . रक्तदान केलेल्याना घड्याळ व प्रमाणपत्र भेट देण्यात आले . तसेच , अल्पोपहार देण्यात आला . यावेळी ५० पिशव्या रक्तसंकलित करण्यात आले .