पुणे प्रवाह न्युज पोर्टल
~ ५ दशलक्षांपेक्षा जास्त दैनंदिन सक्रिय यूझर्स ~
मुंबई, १० जुलै २०२०: भारतात देशांतर्गत विकसित झालेल्या अॅपची मागणी वाढत आहे. त्यामुळे लाइफस्टाइल कंटेंट कॉमर्स प्लॅटफॉम ट्रेलने ५ दशलक्षांपेक्षा जास्त दैनंदिन सक्रिय यूझर्ससह भारतात ट्विटर आणि पिंट्रेस्टसारख्या इंटरनॅशनल कंपन्यांना मागे टाकले आहे. फ्री लाइफस्टाइल अॅपमध्ये #1 वर ट्रेंडिंग करत, प्लॅटफॉने एकाच दिवसात ४ लाखाहून अधिक नवे कंटेंट क्रिएटर्स जोडले तसेच १.२ दशलक्ष नवे कंटेंट अपलोड करण्यात आले आहेत.
भारत सरकारच्या धाडसी निर्णयामुळे ट्रेलसारख्या नवोदित स्टार्टअप या क्षेत्रात एक प्रमुख इंडस्ट्री प्लेअरच्या रुपात पुढे येत आहेत. चिनी अॅपवर बंदी लागल्यानंतर ट्रेलप्रमाणेच पिंट्रेस्ट (२ दशलक्ष दैनंदिन सक्रिय यूझर) आणि ट्विटर (४.४ दशलक्ष दैनंदिन सक्रिय यूझर)च्या वापरातही वाढ दिसून आली.
ट्रेल हा भारतातील व्हिडिओ पिन्ट्रेस्ट म्हणून लोकप्रिय आहे. यूझर्सना आरोग्य आणि फिटनेस, सौंदर्य आणि त्वचेची काळजी, पर्यटन, चित्रपट समीक्ष, पाककृती, गृहसजावट आणि इतर अनेक श्रेणींमध्ये आपले अनुभव, शिफारशी आणि समीक्षणे शेअर करण्याची सुविधा या प्लॅटफार्मवर प्रदान केली जाते. हा लाइफस्टाइल व्लॉगिंग प्लॅटफॉर्म यूझर्सना मूळ भाषेत ३-५ मिनिटांचे व्हिडिओ तयार करण्याची परवानगी देतो. यात एक ‘शॉप’ फीचरदेखील आहे. याद्वारे व्ह्लॉगमध्ये सादर केलेली उत्पादने खरेदी करता येतात. यासह प्लॅटफॉर्म यूझरला आपल्या इंटरफेसद्वारे पुरस्कार, बक्षीस आणि सुट्या मिळवण्याचीही सुविधा उपलब्ध करून देते.
ट्रेलचे सहसंस्थापक, पुलकित अग्रवाल म्हणाले, “ या प्लॅटफॉर्मचा दिवसेंदिवस होणारा विकास आणि कंटेंट क्रिएटर्सची वाढती आवड पाहून आम्ही उत्साहीत आहोत. अशा प्रकारे संधी मिळाल्यामुळे भारतीय इंटरनेट स्टार्टअप वेगाने विकसित होऊ शकते. तसेच दीर्घकाळ उपभोक्त्यांना उत्कृष्ट अनुभव देऊ शकतो. यावर पूर्वी प्रस्थापित कंपन्यांचे वर्चस्व होते.”
२०१७ मध्ये स्थापनेनंतर, ट्रेल देशभरात आपल्या मातृभाषेत बोलणा-या ग्राहकांच्या लाइफस्टाइल कंटेंटच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. याचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त यूझर्स टिअर-२ आणि टिअर ३ शहरांमध्ये आहेत. ट्रेलने नुकतेच प्लॅटफॉर्ममध्ये तीन नव्या भाषा समाविष्ट केल्या आहेत. मराठी, कन्नड आणि बंगाली. म्हणजेच आता हा प्लॅटफॉर्म एकूण ८ भाषांमध्ये (इतर भाषांमध्ये हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम) उपलब्ध आहे.