राष्ट्रवादीचे अरूण लाड पुणे पदवीधर मतदारसंघातुन आघाडीवर

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* राष्ट्रवादीचे अरूण लाड पुणे पदवीधर मतदार संघातुन आघाडीवर


 


पुणे (प्रतिनिधी) :-  पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी चांगली मोर्चेबांधणी केली आहे. लाड यांच्या सोबतच मागच्या वेळेचे उमेदवार सारंग पाटील यांनी देखील गेली ६ वर्षे पूर्ण वेळ मतदारसंघ मध्ये संपर्क ठेवला आहे. सतत पदवीधर मतदारांच्या संपर्कात राहून  विविध अभियान राबवले आहेत. ते सुद्धा आत्ता उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तशी तयारी देखील त्यांच्या कडून  सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील युवक राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांचे ही नाव चर्चेत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना मिळवलेला मोठा मित्र परिवार, स्वतः कृषी पदवीधर, गेली १०/१२ वर्षे पक्षात असलेले स्थान, पत्नी तृप्ती पाटील या पुणे शहरात तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत या उमेश पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत.


ह्या विधान परिषदेच्या तब्बल १९ जागा ह्या महिन्या मध्ये रिक्त झाल्या आहेत. करोनाच्या संकटामुळे ह्या महिन्यात होणाऱ्या सर्व निवडणुका आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत. ह्या मध्ये पुणे पदवीधर विभागाची देखील निवडणूक होणार आहे. या साठी उमेदवारी वरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी चुरस बघायला मिळत आहे पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. २०१४ च्या आधी सहा वर्ष तयारी करून देखील ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने त्यावेळी अरुण लाड यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी लाड यांनी ३७ हजार मते घेतली होती. राष्ट्रवादीत बंडखोरी झाली नसती तर राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सारंग पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असते. राष्ट्रवादी काँग्रेस ने पुणे पदवीधर


२०१४ मधील निवडणुकीत सारंग पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना चांगली टक्कर दिली होती. त्यावेळी पहिल्या पसंतीचा कोटा ७६.२०१ इतका निश्चित केला होता. मात्र, पहिल्या पसंतीची लाड आघाडीवर  होते. त्या अटीतटीच्या लढतीमध्ये चंद्रकांत पाटील हे जेमतेम २ हजार मतांनी निवडून आले होते.


                   सातारा लोकसभा पोट निवडणुकीत सारंग पाटील यांचे वडील श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादी कहून निवडून आले आहेत. त्यामुळे सारंग पाटील यांची उमदवारी मागे पडू शकते. अरुण लाड याची यदा रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी निवड झाली आहे. लाड यांचा पदवीधर मतदारसंघात चागला जनसंपर्क आहे. तसेच राज्यमंत्री डॉ. विद्वजीत कदम हे आमदार झाल्या नंतर त्यांनी पदवीधर  मतदार नोंदणी साठी संपूर्ण भारती विद्यापीठ च्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची नोंद करून एक प्रकारे लाड यांना पाठिबा दिला आहे आणि ती लाड यांची मोठी जमेची बाजू आहे. कदम आणि लाड ह्या दोन्ही गटात मनोमिलन झाल्याने त्याचा फायदा लाड यांना होऊ शकतो. 


             पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापुर, कोल्हापूर व पुणे या पाच जिल्ह्यांचा या पुणे पदवीधर मतदारसंघात समावेश होतो. या मतदारसंघाचे आजपर्यंत अनेक दिग्गजानी नेतृत्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अनेक जण ईच्छुक असले तरी, आता तरी लाड यांचे पारडे जड़ असल्याचे चित्र आहे. 


Popular posts
संग्राम शेवाळे यांनी विद्यार्थी प्रश्नांसाठी शिष्टमंडळसोबत मा.राज्यपाल महोदय यांची भेट घेतली
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
*एक वेळ अवश्य भेट द्या* *मराठा वधू-वर* *सूचक केंद्र* *बालिंगे, गगनबावडा रोड, कोल्हापूर ४१६०१०*
Image
महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळाचा विस्तार
Image
पुण्यातून कलाकार आणि विविध संघटनेची मागणी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना च आमदार या पदावर नियुक्ती करण्यात यावी
Image