*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*आजींना सुरू झाला मदतीचा ओघ हडपसर*
*(पुणे) :* गोसावी वस्ती येथील डोंबारी खेळ करणाऱ्या शांताबाई पवार (वय ८५) यांचा दांडपट्टा खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडिओ देश-विदेशात व्हारयल झाला असून, त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यांचा व्हिडिओ पाहून लोकांकडून त्यांन मदतीसाठी फोन येत आहेत. अभिनेता रितेश देशमुख सह अनेक व्यक्तींनी आजींच्या कार्याचे कौतुक केले आहे. काही लोक घरी येऊन मदत करीत आहेत. अनेकांनी त्यांच्या नातवांच्या शिक्षणासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. सहकारनगर येथे राहणाऱ्या ऐश्वर्या काळे यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यांचा खडतर जीवन प्रवास धडधाकट लोकांसाठीदेखील प्रेरणादायी ठरला आहे.
शांताबाई म्हणाल्या, "ऐश्वर्या काळे यांच्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकले ती माझ्या मुलीसारखी असून, तिचे मी ऋण कधीही विसरू शकणार नाही. मी दहा अनाथ मुलांची जबाबदारी मोठ्या हिमतीने सांभाळत आहे." शांताबाईंचा नातू बारावी उत्तीर्ण झाला असून, त्याला फी सुध्दा भरता न आल्याने, त्याचे पुढील शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शांताबाईंनी वयाच्या नवव्या वर्षापासून डोंबारी खेळ करायला सुरुवात केली. लग्न होईपर्यंत आई-वडिलांसोबत त्यांनी खूप ठिकाणी डोंबारी खेळ केले.लग्नानंतर त्यांनी खेळ करणे बंद केले.मात्र, काही दिवसातच पतीचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी शांताबाईंवर, त्यातूनच पुन्हा त्यांनी डोंबारी खेळ सुरू केला. त्या जागोजागी साहसी खेळांची प्रात्याक्षिक सादर करून मिळालेल्या पैशातून घरखर्च भागवीत आहेत. तसेच, या कलेच्या माध्यमातून त्यांची आपल्या नातवांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यांची नातवंडेदेखील त्यांना या खेळात मदत करत आहेत. उतार वयात देखील त्या शहरात व विविध गावात, त्या आपला खेळ सादर करत आहेत.एक संघर्षमय व्हिडिओ वायरल झाल्याने,एक प्रश्न भेडसावत आहे.
जनता आणि शासन मदतीच्या प्रतिक्षेत अनेक आजीबाई सभोवताली भेटतील त्यांचे काय ???