विपणन व प्रचार विभाग                                 प्रधान कार्यालय लोकमंगल, 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


                             


1501, शिवाजीनगर, पुणे 411 005


020-25614324


                                  media@mahabank.co.in  


 


प्रेस विज्ञप्ति


 


दिनांक 23 जुलाई, 2020


 


आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्र ने 


101 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला


 


दृष्टीक्षेपात निकाल


 


कामगिरीची वैशिष्ट्ये : 


 


आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीचा निव्वळ नफा रु.101 कोटी इतका झाला असून. गतवर्षीच्या तुलनेत ही वृद्धी 24.72% व अनुक्रमिक तुलनेत 75.47% आहे.


आर्थिक वर्ष 2021-21 च्या पहिल्या तिमाहीचा कार्यान्वयन नफा गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 7.91% व गेल्या तिमाहीच्या तुलनेत 19.33% वाढून रु.710 कोटी इतका झाला.


आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत कर्जावरील उत्पन्नात गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 67 बेसिस पॉईंट व गेल्या तिमाहीच्या तुलनेत 83 बेसिस पॉईंट इतकी वाढ होऊन एकूण 7.69% इतकी वाढ झाली आहे.


आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीच्या व्याजाचे निव्वळ उत्पन्न गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 9.14% आणि गेल्या तिमाहीच्या तुलनेत 6.14% इतके वाढून रु.1087.92 कोटी झाले.


 


व्यवसाय वृद्धी :


 


बँकेचा एकूण व्यवसाय वाढून दि.30.6.2020 रोजी रु.2,49,608 कोटी इतका झाला. गतवर्षी दि.30.6.2019 रोजी एकूण व्यवसाय रु.2,31,973 कोटी होता. ही वाढ 7.60% इतकी आहे.


बँकेच्या कासा (चालू खाते व बचत खाते) ठेवी गतवर्षीच्या तुलनेत 13.51% ने वाढून रु.75824 कोटी इतक्या झाल्या. बँकेचे कासा ठेवींचे प्रमाण 50% इतके आहे.


बचत खाते ठेवी गतवर्षीच्या तुलनेत 14.45% इतक्या वाढून रु.63814 कोटी झाल्या.


एकूण ठेवी गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 10.11% इतक्या वाढून रु.152987 कोटी झाल्या.


एकूण कर्जे गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 3.86% ने वाढून 30.6.2020 रोजी रु.96,621 कोटी झाली.


किरकोळ कर्जे आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 31.36% आणि गेल्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ़ 6.05% आहे.


सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांची कर्जे गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 35.92% आणि गेल्या तिमाहीच्या तुलनेत 7.28% इतकी वाढली.


 


भांडवल स्थिती :


भांडवल पर्याप्तता गुणोत्तर दि.30.6.2020 रोजी 13.21% व सामान्य भागभांडवल स्तर 1 गुणोत्तर 10.23% इतके झाले.


तरलता तरतूद गुणोत्तर (लिक्विडीटी कवरेज रेशो) 232.33% आहे.


 


संपत्ती गुणवत्ता :


निव्वळ थकित कर्जे दि.30.6.2019 च्या 5.98% च्या तुलनेत दि.30.6.2020 रोजी 4.10% इतकी कमी झाली. दि. 31.3.2020 रोजी ती 4.77% होती.


एकूण थकित कर्जे दि.30.6.2019 च्या 17.90% च्या तुलनेत दि.30.6.2020 रोजी 10.93% इतकी कमी झाली. दि.31.3.2020 रोजी ती 12.81% होती.


संरक्षक तरतूद गुणोत्तरामध्ये (प्रोविजन कव्हरेज रेशो) 30.6.2019 च्या 81.24% च्या तुलनेत दि.30.6.2020 रोजी 85.62% इतकी सुधारणा झाली. दि.31.3.2020 रोजी ते 83.97% होते.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दि. 17 एप्रिल, 2020 च्या कोव्हिड़-19 बद्दलच्या परिपत्रकानुसार बँकेने आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत कोव्हिड-19 नियंत्रण पॅकेज तरतूद रु.275 कोटी इतकी केली आहे. तसेच नियंत्रकांच्या 10% म्हणजे रु.75 कोटीच्या तरतुदीच्या शिफारसीच्या तुलनेत रु.425 कोटी इतकी एकूण तरतूद दि.30.6.2020 ला केली आहे.


 


बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाने पुणे येथे दिनांक 23.7.2020 रोजी झालेल्या आपल्या बैठकीत 30 जून, 2020 रोजी संपलेल्या तिमाहीच्या आर्थिक निकालांना मान्यता दिली.


 


नफा-तोटा पत्रक - दिनांक 30 जून, 2020 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी


 


दि.30.6.2020 रोजी संपलेल्या तिमाहीचा निव्वळ नफा दि.30.6.2019 रोजी संपलेल्या तिमाहीच्या रु.81 कोटीच्या तुलनेत वाढून रु.101 कोटी झाला. दि.31.3.2020 रोजी संपलेल्या तिमाहीचा निव्वळ नफा रु.58 कोटी होता.


दि.30.6.2020 रोजी संपलेल्या तिमाहीचा कार्यान्वयन नफा दि.30.6.2019 रोजी संपलेल्या तिमाहीच्या रु.658 कोटीच्या तुलनेत रु.710 कोटी इतका वाढला. (रु.52 कोटी ची वाढ 7.84% वृद्धी दर्शवते) दि.31.3.2020 रोजी संपलेल्या तिमाहीचा कार्यान्वयन नफा रु.595 कोटी इतका होता.


दि.30.6.2020 रोजी संपलेल्या तिमाहीचे निव्वळ व्याजाचे उत्पन्न दि.30.6.2019 रोजी संपलेल्या तिमाहीच्या रु.997 कोटीच्या तुलनेत रु.1088 कोटी इतके वाढले. (रु.91 कोटी ची वाढ 9.14% वृद्धी दर्शवते) हेच उत्पन्न दि.31.3.2020 रोजी संपलेल्या तिमाहीत रु.1023 कोटी व 31.3.2020 रोजी संपलेल्या वर्षात रु.4279 कोटी होते.


दि.30.6.2020 रोजी संपलेल्या तिमाहीत व्याजाच्या सकल उत्पन्नात दि.30.6.2019 रोजी संपलेल्या तिमाहीच्या तुलनेत 7.02% पासून 7.69% इतकी वाढ झाली. दि.31.3.2020 रोजी संपलेल्या तिमाहीत हे उत्पन्न 6.86% होते.


दि.30.6.2020 रोजी संपलेल्या तिमाहीत खर्च आणि उत्पन्न यांच्या गुणोत्तरामध्ये 30.6.2019 रोजी संपलेल्या तिमाहीच्या 53.50% च्या तुलनेत 51.25% इतकी सुधारणा झाली. दि.31.3.2020 रोजी संपलेल्या तिमाहीत हे गुणोत्तर 57.93% होते.


दिनांक 30.6.2020 रोजीचा ताळेबंद :


 


दि.30.6.2020 रोजी एकूण व्यवसाय रु.2,49,608 कोटी इतका झाला. गतवर्षी दि.30.6.2019 रोजी एकूण व्यवसाय रु.2,31,973 कोटी व दि.31.3.2020 रोजी रु.2,44,955 कोटी इतका होता.


दि.30.6.2020 रोजी एकूण ठेवी रु.1,52,987 कोटी इतक्या झाल्या. गतवर्षी दि.30.6.2019 रोजी असणा-या रु.1,38,941 कोटीच्या तुलनेत त्यात वाढ झाली. दि.31.3.2020 रोजी एकूण ठेवी रु.1,40,099 कोटी इतक्या होत्या.


दि.30.6.2020 रोजी कासा ठेवी रु.75,824 कोटी इतक्या झाल्या. गतवर्षी दि.30.6.2019 रोजी कासा ठेवी रु.66801 कोटी होत्या. गतवर्षीच्या तुलनेत त्यात रु. 9021 कोटी (13.51%) इतकी वाढ झाली. दि.31.3.2020 रोजी या ठेवी रु.75475 कोटी इतक्या होत्या. एकूण ठेवींमध्ये कासा ठेवींचे प्रमाण दि.30.6.2020 रोजी 50% इतके होते.


 


भांडवल पर्याप्तता :


बेसेल 3 निकषांनुसार दि. 30.6.2020 रोजी भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 13.21% होते. दि.30.6.2019 रोजी ते 11.69% होते.


सीईटी 1 भांडवल 10.23% होते जे नियंत्रकांच्या किमान शिफारसींपेक्षा बरेच अधिक आहे.


 


संपत्ती गुणवत्ता :


एकूण व निव्वळ थकित कर्जे दि.30.6.2020 रोजी अनुक्रमे रु.10559 कोटी (10.93%) आणि रु.3677 कोटी (4.10%) इतकी होती. दि.30.6.2019 रोजी ती अनुक्रमे 16,650 कोटी (17.90%) व रु.4856 कोटी (5.98%) तसेच दि.31.3.2020 रोजी अनुक्रमे 12152 कोटी (12.81%) व रु.4145 कोटी (4.77%) इतकी होती.


संरक्षक तरतूद गुणोत्तरामध्ये दि.30.6.2019 रोजी 81.24% वरुन दि.30.6.2020 रोजी 85.62% इतकी वाढ झाली. हे गुणोत्तर दि.31.3.2020 रोजी 83.97% होते. तरतूद गुणोत्तरातील वाढ ही मुख्यत: दि.30.6.2020 च्या कोव्हिड-19 च्या रु.425 कोटी तरतुदीमुळे आहे.


कोव्हिड सहाय्य :


आरबीआय ने जाहीर केल्याप्रमाणे 24% ग्राहकांनी मुदत कर्जांच्या स्थगितीचा लाभ घेतला. दि.30.6.2020 रोजी संपलेल्या तिमाहीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी कोव्हिड-19 संबंधित रु.2500 कोटींची कर्जे मंजूर करण्यात आली. करोना साथीमध्ये 97% शाखा आणि 89% एटीएम कार्यरत होती. शाखा, कार्यालये आणि एटीएम मध्ये जोमदार संरक्षक व्यवस्था (निर्जंतुकीकरण, संरक्षक साधने इत्यादि) करण्यात आली. बँकेच्या कर्मचा-यांनी एकूण रु.5 कोटी पीएम केअर्स निधी व मुख्यमंत्री सहायता निधीला दिले. करोना योद्ध्यांसाठी बँकेने मुखपट्ट्या, हातमोजे, पाण्याच्या बाटल्या, अन्न पाकिटे, किराणा माल इ.गोष्टींच्या स्वरूपात मदत दिली.


 


या साथीत बँकेने ग्राहकांना खालीलप्रमाणे मदतीचा हात दिला.


 


1) दि. 01.03.2020 ते 31.08.2020 या कालावधीमध्ये कर्जफेडीसाठी 6 (3+3) महिने स्थगिती/ कॅश क्रेडिटवरील व्याजासाठी व्याज आकारणी पुढे ढकलणे. 


2) कर्जदारांच्या एकूण बाकी कर्जाच्या 20% पर्यंत खेळते भांडवल पुरविण्यासाठी जीईसीएल (गॅरंटेड इमर्जन्सी क्रेडिट लाईन) योजना.


3) स्टँडबाय लाईन ऑफ क्रेडिट (एसएलसी) द्वारे तातडीची कर्जसुविधा.


4) कोव्हिड-19 महाबँक एसएचजी (स्वयं सहायता बचत गट) राहत योजना


5) कोव्हिड-19 महाबँक किसान राहत योजना


6) कोव्हिड-19 मुळे चालू व बचत खात्यातील काही विशिष्ट शुल्कांना माफी


        विपणन व प्रचार विभाग                                प्रधान कार्यालय


लोकमंगल, 


1501, शिवाजीनगर, पुणे 411 005


020-25614324


शीर्ष व्यवसाय   


                                                                     (रू. कोटी मध्ये)


 


विवरण


रोजी


       वृद्धि


जून 19


मार्च 20


जून 20


वार्षिक


तिमाही  


एकूण व्यवसाय


231973


244955


249608


7.60%


1.90%


ठेवी


138941


150066


152987


10.11%


1.95%


त्यापैकी कासा ठेवी


66801


75475


75824


13.51%


0.46%


एकूण ठेवींमध्ये कासाचे प्रमाण (%) 


48.08%


50.29%


49.56%


 


 


एकूण कर्जे   


93032


94889


96621


3.86%


1.83%


एकूण गुंतवणूक


52861


58171


61150


15.68%


5.12%


 


नफा


                                                 (रू. कोटी मध्ये)


 


 


        तपशील 


समाप्त तिमाही


बदल 


जून 19


मार्च 20


जून 20


वार्षिक


तिमाही 


एकूण उत्पन्न


3192


3198


3265


2.28%


2.09%


एकूण खर्च


2533


2603


2555


0.86%


-1.85%


कार्यान्वयन नफा


658


595


710


7.91%


19.34%


कर वगळता तरतुदी आणि आकस्मिकता 


921


910


609


-33.88%


-33.08%


करपूर्व नफा


(262)


(315)


101


138.60%


132.10%


कर खर्च


    (343)


      (373)


0


-


-


निव्वळ नफा


81


58


101


24.72%


74.17%


 


ताळेबंद                                            


                                                                     (रू. कोटी मध्ये)


देयक


रोजी


जून 19


मार्च 20


जून 20


भांडवल 


5824


5824


5824


गंगाजळी


4626


4931


5032


ठेवी


138941


150066


152987


कर्जे


3205


3670


12768


अन्य देणी व तरतुदी


3204


4375


5060


एकूण


155800


168867


181671


मालमत्ता


रिज़र्व बैंक ऑफ इंडिया कडील रोख व ठेवी   


8041


10354


16956


इतर बँकांकडील येणी व अल्प सूचनेवरील रक्कम    


82


93


119


गुंतवणुकी


52488


57741


60729


कर्जे (निव्वळ)


81205


86872


89740


स्थिर मालमत्ता


1729


1676


1696


इतर मालमत्ता


12255


12132


12432


एकूण


155800


168867


181671


गुंतवणुदारासांठी वेगळे सादरीकरण बँकेच्या www.bankofmaharashtra.in या वेबसाइट वर वेगळे देण्यात येत आहे.


Photo


फोटो मध्ये : डावीकड़ून श्री हेमन्त टम्टा, कार्यकारी संचालक, श्री ए. एस. राजीव, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री संजय रूद्र, महाप्रबंधक, वित्त व लेखा तसेच श्री नागेश्वर राव, कार्यकारी संचालक हे (द्रुक श्राव्य) व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैंकेचा निकालाची माहिती देताना