पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मुंबई, २१ जुलै २०२०: आज सलग पाचव्या दिवशी बेंचमार्क निर्देशांकांनी बँकिंग आणि ऑटो क्षेत्राच्या आधारे सकारात्मक व्यापार केला. निफ्टीने १.२७ % किंवा १४०.०५ अंकांची बढत घेत ११,१९२.२५ वर विश्रांती घेतली. तर दुसरीकडे एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.३७% किंवा ५११.३४ अंकांची वृद्धी घेत ३७,९३०.३३ अंकांवर स्थिरावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात जवळपास १४२७ शेअर्सनी नफा कमावला, १२२३ शेअर्स घसरले तर १५५ शेअर्स स्थिर राहिले. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (६.४२%), आयओसी (५.६६%), आयशर मोटर्स (५.३३%), आणि मारुती सुझूकी (४.२२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर बजाज फायनान्स (४.००%), बजाज फिनसर्व (३.५२%), ब्रिटानिया (२.३८%), भारती इन्फ्राटेल (१.७५%), आणि सिपला (१.६४%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.
बँक, ऊर्जा, वाहन, धातू आणि इन्फ्रा सेक्टर्सनी आज सकारात्मक व्यापार दर्शवला असला तरी सेक्टरल निर्देशांकांनी आज संमिश्र ट्रेंड नोंदवला. एफएमसीजी आणि फार्मा सेक्टर्समध्ये घसरण दिसून आली बीएसई मिडकॅपने ०.२२% अशी काहीशी घसरण घेतली तर बीएसई स्मॉलकॅपने ०.२४% ची बढत घेतली.
एसबीआय लाइफ इन्शुरन्स: कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा ५.१% नी वाढला. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ४.३९% नी वाढले व त्यांनी ८९२.०० रुपयांवर व्यापार केला.
बजाज फायनान्स: कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा १९% नी घसरला तसेच निव्वळ व्याजात १२% ची वाढ झाली. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ४.००% नी वधारले व त्यांनी ३३०४.०० रुपयांवर व्यापार केला.
एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस: कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत नफा झाल्याचे नोंदवले. कंपनीचा निव्वळ नफा १४% नी वाढला तर क्रेडिट कार्ड्सदेखील २०% नी वाढले. परिणामी कंपनीचे शेअर्स ३.२६% नी वाढले व त्यांनी ७७५.५० रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपयाने आज इंट्राडेमधील नफा गमावला असला तरी आज उच्चांकी कामगिरी केली. सकारात्मक देशांतर्गत इक्विटी मार्केटमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७४.८३ रुपयांचे मूल्य कमावले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सोन्याने आजच्या सत्रात नऊ वर्षातील उच्चांकाजवळचे स्थान मिळवले. स्पॉट गोल्ड ०.१% नी वाढून त्याचे दर १८१७.२३ डॉलर प्रति औस एवढे नोंदवले गेले.
जागतिक बाजार: कोव्हिड-१९ लसीने पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरक्षित, सहन करण्यायोग्य आणि प्रतिकार वाढवणारी असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठाने दर्शवले. कोव्हिड-१९ लसीच्या या सकारात्मक बातमीमुळे जागतिक बाजार वृद्धीकडे झेपावला. गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना दिसून आल्या. आजच्या व्यापारी सत्रात नॅसडॅकचे शेअर्स २.५१%, हँगसेंगचे शेअर्स २.३१%, निक्केई २२५ चे शेअर्स ०.७३%, एफटीएसई १०० चे शेअर्स ०.५५ टक्क्यांनी तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स २.००% नी वाढलेले दिसून आले.
For further information: Sachin Kulaye 9867036368, Value360 Communications.