पुणे प्रवाह न्युज पोर्टल
दापोडी येथे लिंभोरे वस्तीमध्ये राहणाऱ्या जेष्ठ काँग्रेस महिला कार्यकर्त्या शंकुतला भास्कर काळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्या ८५ वर्षाच्या होत्या . त्यांच्यामागे चार मुले , चार मुली , सुना , जावई , नातवंडे व पणतू असा परिवार आहे . ब्लेसिंग नर्सिंग ब्युरोच्या संचालिका सुरेखा सॅमवेल कोनेसागर , ऐलीनफुल गॉसफल चर्चचे रेव्हरड शारून भास्कर काळे , हेब्रोन चर्चचे रेव्हरड सॅमसन भास्कर काळे , पास्टर सालोमन काळे , जनसेवा तरुण मंडळाचे कार्यकर्ते जीवन भास्कर काळे व मेथाडिस्ट चर्च महिला मंडळाच्या कार्यकर्त्या साधना अशोक कोनेसागर यांच्या मातोश्री होत्या .
माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण , जेष्ठ नेते शरद पवार व माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांच्यासमवेत काँग्रेस पक्षाचे काम केले . त्याचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले . त्याचे ख्रिस्ती समाजात भरीव कार्य केले .
दापोडी येथील ख्रिस्ती दफन भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले