कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


~ कॉन्वेजीनियसची भारतभरात विस्तृत अशी #एडटेकफॉरनयाभारत' मोहीम ~


 


मुंबई, २८ जुलै २०२०: कॉन्वेजीनियस हे एडटेक सोशल एंटरप्राइज सध्याचे शिक्षण आणि कौशल्यातील फरक कमी करण्यासाठी प्रयत्न करते. तंत्रज्ञान प्रणित शिकण्या-शिकवण्याच्या किफायतशीर साधनांद्वारे ही कंपनी आता संपूर्ण भारतभरात विस्तृत अशी #एडटेकफॉरनयाभारत' मोहीम लाँच करत आहे. या मोहिमेअंतर्गत, सोशल एंटरप्राइज उच्च दर्जाचे शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेच्या तळाशी असलेल्या १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना आवश्यक संसाधने पुरवणार आहे.


 


ऑनलाइन शिक्षणात संसाधनांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा एक मोठा समूह शिक्षणापासून वंचित राहिला. यापैकी बहुतांश विद्यार्थी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील आहेत तसेच सरकारी किंवा परवडणा-या खासगी शाळेत शिकतात. आपले उद्दिष्ट साध्य करण्याकरिता बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कॉन्वेजीनियसने आंध्र प्ररदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा इत्यादी राज्यांशी करार केला आहे. ते विविध कोर्पोरेट्स, एनजीओ आणि परवडणा-या खासगी शाळांसोबत काम करून वैयक्तिकृत आणि अनुकूलन करण्याच्या शिक्षण पद्धती कुठेही, कोणत्याही वेळी प्रदान करतात.


 


कॉन्वेजीनियसचे संस्थापक श्री जयराज भट्टाचार्य म्हणाले, “या मोहिमेचा उपयोग अल्पसंख्यांक लोकसंख्येच्या एका मोठ्या समूहावर प्रभाव पाडेल. त्यांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी इंटरनेट तंत्रज्ञानाचे फायदे आणि नूतनाविष्कार प्रदान केले जातील. जेणेकरून ते समान संसाधनांद्वारे ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करू शकतील. याद्वारे त्यांना समृद्ध जीवन जगण्यास मदत होईल. कॉन्वेजीनियसमध्ये आम्ही, देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणात परिवर्तन घडवण्यासाठी संपूर्णपणे समर्पित आहोत.”


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image