*साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे....* *पुणे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे....*


 


*पुणे :- भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा*


* भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवास्थानी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस सुखदेव चंद्रकांत अडागळे , अतुल साळवे, रुपेश सोनवणे पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष डॉ. भरत वैरागे, श्रीराम कांबळे इत्यादी पदाधिकऱ्यांनी लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त दादां कडे निवेदन सादर केले. निवेदन सादर करण्याचे कारण डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार च्या काळात अर्थमंत्री सुधिरभाऊ मुनगुंटीवार यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला होता परंतु corona सारख्या महामारी च्या या संकटात या निधीच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकत नाही . म्हणून आमची मागणी अशी आहे की तो निधी lapse होण्यापेक्षा त्या निधीच्या माध्यमातून सर्वसामान्यां साठी पुण्यात लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे covid19 सेंटर उभारण्यात यावे. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे. यासंदर्भात आज दिनांक- 25/07/2020 रोजी आदरणीय प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देऊन बैठक पार पाडण्यात आली.