मुकुल माधव विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


**


 


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दहावीची परीक्षा देणारी विद्यालयाची ही पहिलीच तुकडी होती. एकूण २६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केले. २६ पैकी १९ विद्यार्थ्यांनी ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त करून विशेष श्रेणी प्राप्त केली. उर्वरित सात विद्यार्थ्यांना ६४% ते ७३% यादरम्यान गुण प्राप्त झाले. मुकुल माधव विद्यालयाची ही पहिलीच तुकडी असल्याने वर्षाच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात येत होते. अभ्यासाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुकुल माधव विद्यालयतर्फे विशेष लक्ष देण्यात आले होते.


 


शिक्षणाचा हा वसा पुढे नेण्याच्या दृष्टीने तसेच ग्रामीण भागातील मुलांना पुणे-मुंबई यासारख्या ठिकाणी देण्यात येणार्‍या उच्च प्रतीच्या शिक्षणाचा दर्जा कायम टिकवत मुकुल माधव विद्यालयातर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून (२०२०-२१) ज्युनिअर कॉलेजची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार आहे. विज्ञान आणि वाणिज्य या दोन शाखासह जुनिअर कॉलेजची सुरुवात होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज असून, मुकुल माधव विद्यालयाच्या जूनियर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यालयातर्फे करण्यात येत आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुकुल माधव विद्यालयाच्या शिक्षकांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले. मुकुल माधव फौंडेशनच्या व्यवस्थापक विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकवर्ग व पालकांचे अभिनंदन केले. 


 


रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, "आमचे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुकुल माधव विद्यालयाचा संपूर्ण कर्मचारीवृंद यांमुळे आम्हाला आज अभिमानाचा क्षण अनुभवता येत आहे. खरेतर आमची शाळा फक्त ११ वर्षांपूर्वी सुरू झाली आणि या दरम्यान अनेक संकटांना सामोरे जावे लागले. परंतु समाजाला जास्तीत जास्त चांगले देण्याचा आमचा प्रयत्न सफल झाला आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल कौतुक करून त्यांना आनंदी आरोग्यदायी भविष्यासाठी शुभेच्छा देते."