पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*
ठाकरवस्ती, सोमाटणे फाटा पुणे येथे आज दि. १३/७/२०२० वार सोमवार रोजी साधु वासवानी मिशन पुणे आणि गणपती चौक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रेनकोट वाटप करण्यात आले.
गणपती चौक मित्र मंडळ लक्ष्मीरोड पुणे चे अध्यक्ष विशाल साळवी यांच्या ओळखीचे श्री.दिनेश येवले तंटामुक्ती अध्यक्ष,गोडुंबरे गाव मावळ यांच्या गावी उपक्रम राबवण्यात आला तसेच यावेळी दिनेश येवले संदिप कदम उपसरपंच आणि पिंटू सातकर सामाजिक कार्यकर्ते यांनी गावक-यांची माहिती देवून सर्वांना रेनकोट मिळतील यासाठी सहकार्य केले.
काबाडकष्ट करणारा हा समाज, या डोंगरांळ भागात असताना उन वारा पावसाची तमा न बाळगता धनधान्य पिकवत असतो. समाजातील तळागाळातील लोकांना सहकार्य करण्याचे ध्येय आणि उद्दिष्ट साधू वासवानी मिशन पुणे आणि गणपती चौक मित्र मंडळ लक्ष्मीरोड पुणे यांचे असल्याने संयुक्तपणे हा उपक्रम राबवण्यात आला.
टाळेबंदी (लाॅकडाउन) च्या काळात म्हणजे मागील २५ मार्च २०२० पासून ते आजतागायत अविरत अन्नदानाचा उपक्रम गणपती चौक मित्र मंडळ लक्ष्मीरोड पुणे येथे सुरु आहे.अन्नदानाच्या वितरणात आजवर विशाल गवते, सुचित खुटवड, केतन पाटील, अमीत मुनोत, मंदार रुद्रकर, सागर बागुल, उमेश पारखे या सर्वांनी सहकार्य केले आहे.
गणपती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल साळवी, उपाध्यक्ष अमीत कट्टी, निलेश शहा, प्रविण गुरव आणि सर्व कार्यकर्ते याकामी तन मन धन अर्पून साथ देत आहेत.
समाजाविषयी असणारी कणव आणि या कठीण प्रसंगी सामान्यांची पाठराखण करण्याचे काम गणपती चौक मित्रमंडळ लक्ष्मीरोड पुणे करत आहे.
या उपक्रमास साधु वासवानी मिशन पुणे तर्फे राजेश सजनानी, विजय दासवानी आणि सहेली मॅडम यांनी अगदी जिद्दीने बरोबरीने साथ देत आजवरचा कार्यभाग टिकवला आहे. निरपेक्ष भावना, समाज जगला पाहिजे या भावनेचा स्विकार व अंगीकार साधु वासवानी मिशन ने केला आहे. यामुळेच साधारण ७००/८०० लोकांना रोज जेवण गणपती चौक मित्र मंडळ लक्ष्मीरोड पुणे येथे सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत वितरीत होत आहे
गणपती चौक मित्र मंडळ लक्ष्मीरोड पुणे व साधु वासवानी मिशन चा एकच ध्यास आहे
खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ।।धृ।।
जगी जे दीन अति-पतीत, जगी जे पद-दलीत
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे