सोन्याची दरवाढ कायम; दर प्रति औंस १८०२.७ डॉलरवर पोहोचले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


मुंबई, १४ जुलै २०२०: जगभरातील सरकारांचे वाढत्या साथीच्या स्थितीवर कसे नियंत्रण मिळवायचे तसेच मंदीकडे जाणा-या जागतिक अर्थव्यवस्थेला कसे रोखायचे याकडे लक्ष्य लागलेले आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे प्रमाण अमेरिका आणि जगातील इतर देशांमध्ये झपाट्याने वाढत आहे. तसेच आर्थिक सुधारणेच्या वाढीव कालावधीच्या चिंतेने गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्तेकडे कल दर्शवला. दरम्यान स्पॉट गोल्डचे दर ०.२४टक्क्यांनी वाढले आणि त्यांनी प्रति औंस १८०२.७ डॉलरवर स्थिरावल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे रिसर्च एव्हीपी श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


 


मागील सात महिन्यांत कोरोना विषाणूने जगभरातील अर्धा दशलक्ष लोकांचा बळी घेतला आहे. अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले आहे, त्यामुळे पिवळ्या धातूच्या किंमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, अमेरिकी डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे इतर चलनधारकांसाठी सोने अधिक महागात पडते. त्यामुळे किंमतीच्या वाढीवर मर्यादा आल्या आहेत.


 


डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १.११ टक्क्यांनी घसरून ४०.१ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले.साथीभोवतीच्या तणावात चिंताजनक वाढ झाल्याने मागणीची चिंताही वाढली आहे. ओपेक आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी तीव्र उत्पादन कपात सुरू ठेवल्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात सुधारणा होण्याची आशा होती. कच्च्या तेलाच्या मागणीत सुधारणा होत असल्याने ओपेकने उत्पादनातील कपात २ दशलक्षांनी कमी करून ७.७ दशलक्ष बीपीडी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र हवाई वाहतुकीवरील निर्बंध कायम असल्यामुळे बाजारातील भावनांचा तोल गेला.


 


लंडन मेटल एक्सचेंज (एलएमई) वरील बेस मेटलचे दर वाढले. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी जोरदार प्रोत्साहनपर योजना आखल्यामुळे या समुहातील झिंकच्या मूल्यात वाढ झाली. चिनी बँकांनी या विनाशकारी आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अर्थव्यवस्थेतील पत सातत्याने वाढवली आहे. पिपल्स बँक ऑफ चायना (पीबीओसी)ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, चिनी बँकांनी जून २०२० पर्यंत नवे कर्ज १.८१ ट्रिलियन युआन (जवळपास २५८.२९ अब्ज डॉलर) पर्यंत वाढवले आहे. मे २०२० मध्ये दिलेल्या १.४८ ट्रिलियन युआनपेक्षा ही रक्कम जास्त आहे.


 


एलएमई कॉपरचे दर २.४८ टक्क्यांनी वाढून ६५७१.० डॉलर प्रति टनांवर बंद झाले. कारण चिलीसारख्या प्रमुख निर्यातदार आणि उत्पादक देशांमध्ये खाणकाम बंद झाल्याने पुरवठ्यात अडचणी येण्याची भीती आहे. दरम्यान , चीनसारख्या सर्वात मोठ्या धातूच्या ग्राहकाकडून वाढती मागणी असल्यामुळे बाजारातील भावनांना उत्साह देण्यात मदत झाली आहे.


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली