लॉक डाऊन ' चा खेळ म्हणजे अवदसाच !

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


'


 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला लॉक डाऊनचा खेळ अजूनही सुरूच आहे 


अनलॉक अन पुनश्श हरिओम या घोषणा हवेत विरल्यात .पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर सोशल मीडियावर कोरोना सोबत जगायला शिका असा सल्ला देताहेत अन दुसरीकडे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार लॉक डाऊन करायला लावतात हे सगळे हास्यास्पद चालले आहे .आधीच्या लॉक डाऊन मुळे काय काय आपत्ती कोसळल्या याचे थोडेही भान सरकारला नाही याचे आश्चर्य वाटते .लॉक डाऊन मुळे लोकांची झालेली ,होणारी उपासमार ,गेलेल्या व भविष्यात जाणाऱ्या नोकऱ्या याचा विचार केला तर कोरोना पेक्षा हे भयंकर आहे. असे तसे मरायचेच आहे तर कोरोनाशी दोन हात करून मरु अशी सामान्यांची भावना आहे पण ज्यांचे जळता जळत नाही त्यांना लॉक डाऊनची दळभद्री लक्षणे सुचत आहेत .अनेकांनी एवढं कमवून ठेवलंय की त्यांच्या दहा पिढ्या घरातच किंवा बंगल्यातच पडून राहिल्या तरी त्यांचे काही बिघडणार नाही .पण सामान्यांचे काय ? अन कं पन्या ,हॉटेल्स ,घरेदारे सगळं बंद करून बसल्याने तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल यास शास्त्रीय आधार काय ? मग वारंवार ही अवदसा का आठवावी ? रुग्ण आजारातून उठावा तसे लॉक डाऊन मधून बाहेर पडत हळूहळू उद्योग सुरू होत असताना अन सरकारांनीच अनलॉक अन पुनश्च हरिओम सारख्या घोषणा केल्या असताना मागे फिरण्यात ,शेपूट घालण्यात कसला पुरुषार्थ आहे ?


-नंदकुमार सातुर्डेकर


(पत्रकार)