श्री. वसंतराव लिमये यांचे निधन.

...


भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा सोहळा असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. वसंतराव लिमये यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. 


वसंतराव लिमये हे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनात 50 वर्षांपासून कार्यरत होते. ते भारतीय नौदलाच्या विक्रांत या लढाऊ नौकेवर काही काळ कार्यरत होते. तसेच टेल्को या नामांकित कंपनीतही त्यांनी कार्य केले. विद्यमान आमदार तथा सभासद पुणे महानगरपालिका आणि माजी महापौर मा. सौ. मुक्ता शैलेश टिळक यांचे ते वडील होत. श्री. वसंतराव लिमये यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 


--------------------