राष्ट्रवादीने लढवय्या सहकारी गमावला, संजोग वाघेरे पाटील यांनी दत्ता साने यांना आदरांजली*

*


 


पिंपरी ४ जुलै


 


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा व विरोधकावरती दबदबा ठेवणारा लढवय्या चांगला सहकारी गमावल्याची भावना व्यक्त करत पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 


 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे चिखली प्रभागाचे नगरसेवक दत्ता साने यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांना कायम स्मरणात राहील. त्यांच्या विरोधी पक्षनेते कालखंडात पक्षाची प्रतिमा जनसामान्यात पुन्हा रुजवण्यास मोठे मदत झाली.


 


त्यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. पक्ष संघटनेची ध्येयधोरणे मोठ्या तडफेने राबविणाऱ्या झुंजार कार्यकर्त्याची, सहकाऱ्याची उणीव कायमच राष्ट्रवादी काँग्रेसला जाणवेल. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहातील तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांचं योगदान कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.