राजगृह'वरील हल्ल्याचा 'रिपाइं'कडून निषेध

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) 'रिपाइं' पुणे शहराच्या वतीने निषेध करण्यात आला. बंगल्यातील वस्तूंची तोडफोड करणाऱ्या जातीवादी वृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केली.


 


महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून दलितांवर अन्याय वाढले असून, आम्हाला पूजनीय असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळावर हल्ला होणे ही निंदनीय बाब आहे. या हल्ल्याची सीबीआयमार्फत चौकशी करून, दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.


 


पुणे स्टेशनजवळील आंबेडकर पुतळा येथे 'रिपाइं'ने निषेध आंदोलन केले. यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, निलेश आल्हाट, किरण भालेराव, विनोद टोपे, राजेश गाडे, संतोष खरात, जितेश दामोदरे, सज्जन कवडे, मुकेश काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.