शॉपमॅटिकने तिमाही व्यवहारात २०० टक्के वृद्धी नोंदवली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  


मुंबई, १५ जुलै २०२०: कोव्हिड-१० च्या साथीत असंख्य उद्योगांचा संघर्ष सुरू असताना, आंतरराष्ट्रीय ई कॉमर्स सक्षमक शॉपमॅटिक कंपनीने या वर्षी अत्यंत आशादायी वृद्धीचे संकेत दिले आहे. देशातील एसएमई क्षेत्रासाठी तंत्रज्ञान सक्षम उपायांसह, शॉपमॅटिकने व्यवहार, जीएमव्ही आणि महसुलात मागील तिमाहीच्या तुलनेत एप्रिल ते जून या तिमाहीत २०० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ई कॉमर्स समाधान प्रदाता या भूमिकेतून शॉपमॅटिक एसएमई आणि वैयक्तिक उद्योजकांचे व्यवसाय ऑनलाइन आणण्यासाठी विविध ई कॉमर्स लँडस्केपचे घटक एकाच व्यासपीठावर आणते.


 


कस्टमाइज्ड ऑनलाइन स्टोअर तयार करणे, सोशल आणि चॅट कॉमर्सद्वारे विक्री करणे, एकात्मिक जागतिक पेमेंट पर्याय आणि शिपिंग सोल्यूशन्सह बहविध बाजारपेठेत विक्री करणे, डिजिटल जाहिराती तयार करून त्याचा प्रसार करणे इत्यादी प्रकारच्या मदतीद्वारे शाॅपमॅटिक प्रत्येकासाठी ऑनलाइन विक्री सुलभ करते.


 


साथीच्या काळात शॉपमॅटिकने भारत आणि सिंगापूरच्या किराणा दुकानांसाठी योग्य उपाय शोधून काढले. पूर्व विकसित कॅटलॉगच्या सामग्रीच्या माध्यमातून त्यांना ऑनलाइन अस्तित्व निर्माण करण्यास सक्षम केले. तांत्रिक माहिती-डिझाइनविना किंवा डिझाइनच्या अनुभवाशिवाय स्थानिक दुकान मालकांना सहजपणे त्यांचे वेब स्टोअर तयार करण्यास शॉपमॅटिकने परवानगी दिली. या ऑफरमध्ये एका यशस्वी ऑनलाइन किराणा दुकानातील अमर्याद यादीसह पूर्व विकसित कॅटलॉग्स, सोपे यादी व्यवस्थापन, सुरक्षित आणि तत्काळ ऑनलाइन पेमेंट्स तसेच काळाची गरज लक्षात घेता, संपर्कविहीन वितरण आणि सेल्फ पिकअप पर्याय यासारख्या सर्व पर्यायांचा समावेश आहे.


 


शॉपमॅटिकचे सीईओ आणि सह संस्थापक श्री अनुराग अवुला म्हणाले, "व्यवसायाला डिजिटल स्वरूप देणे हा पर्याय नाही तर काळाची गरज आहे. स्थापनेपासून गेल्या ५ वर्षांत ग्राहकांना सर्वसमावेशक अनुभव देण्यासाठी व्यापा-यांच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यासपीठासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीकोनामुळे आम्हाला चालना मिळाली आहे. यामुळे आमच्या ग्राहांकांना व्यवहारांमध्ये लक्षणीय