मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वृद्धी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


मुंबई, ९ जुलै २०२०: वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येमुळे बुधवारी सोन्याची मागणी तीव्र वाढली. परिणामी स्पॉट गोल्डचे दर ०.८८ टक्क्यांनी वाढून ते १८१०.१ डॉलर प्रति औंसांवर बंद झाले. साथीच्या आजाराने २१० देशांना विळखा घातला असून जगभरात ११.८९ दशलक्ष लोकांना याचा संसर्ग झाला आहे. जगभरातील प्रमुख मध्यवर्ती बँकांनी विशेष प्रोत्साहनवर योजना जाहीर केल्या, यासह व्याजदरही जवळपास शून्यापर्यंत आणले आहेत. या सर्वांमुळे सोन्याच्या किंमती वाढण्यास मदत झाली असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे रिसर्च एव्हीपी श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. अमेरिकी डॉलरचे मूल्य घसरल्यामुळे इतर चलनधारकांसाठी सोने स्वस्त झाले आहे.  


 


अर्थव्यवस्था सुधारणेचा कालावधी अनेक पटींनी वाढण्याचा बाजारातील भावनांवर परिणाम झाला. त्यामुळे बुधवारी कच्च्या तेलाचे दर ०.०२ टक्क्यांनी कमी झाले. ते ४०.६ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले.


 


पेट्रोलमध्ये काही प्रमाणात मागणी वाढलेली दिसून आली. ऊर्जा माहिती प्रशासन (ईआयए)च्या अहवालानुसार, अमेरिकेच्या पेट्रोल साठ्यात ४.८ बॅरलपेक्षा जास्त घट दिसून आली. त्यामुळे मागणी ८.८ दशलक्ष बीपीडीने वाढली आहे. ओपेक सदस्य राष्ट्रांनी पुढील काही महिन्यांसाठी तेलनिर्मितीत तीव्र उत्पादन कपातीवर सहमती दर्शवल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीच्या घसरणीवर मर्यादा आल्या.


 


बुधवारी, लंडन मेटल एक्सचेंजवरील बेस मेटलच्या दरात वाढ दिसून आली. कारण जगभरात पुरवठ्यात मोठ्या अडचणी येत असतानाच धातूचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनने मागणीत वाढ नोंदवली आहे. जून २०२० मध्ये चीनचे झिंक उत्पादन ८.३ टक्क्यांनी (वार्षिक) घटले. फेब्रुवारी २०२० नंतर हे सर्वाधिक कमी आहे. उत्पादन ३,९६००० टनांनी कमी झाले. ते चीनमधील मे २०२० मधील उत्पादनाच्या तुलनेत ११,००० टनांनी घटले.


 


जगातील सर्वात मोठा तांबे उत्पादक देश चिलीमधील खाणी बंद झाल्या. त्यामुळे बुधवारी लंडन मेटल एक्सचेंज (एलएमई) वरील तांब्याचे दर ०.७१ टक्क्यांनी वाढले व ते ६२३२ डॉलर प्रति टनांवर बंद झाले. शीर्ष धातू ग्राहकांकडून मागणी वाढल्याने किंमतही वाढली.