हवेतून प्रसार होणा-या कोव्हिड-१९ वर मात करण्यासाठी 'मॅग्नेटो क्लीनटेक'ची सुविधा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


मुंबई, १३ जुलै २०२०: जगभरातील वैज्ञानिकांना विविध संशोधन व अभ्यासातून आढळून आले की, कोरोना विषाणू हा एअरबॉर्न म्हणजे हवेतूनही एका व्यक्तीतून दुस-या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही याला मान्यता दिली. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल आणि सर्व प्रकारच्या इनडोअर संस्थानांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मॅग्नेटो क्लीनटेकमध्ये सर्व आव्हाने लक्षात घेत कमर्शिअल एअर प्युरिफिकेशन सिस्टिम तयार करण्यात आली आहे. घातक विषाणूंचा प्रसार आणि धोकादायक सूक्ष्मजीवांसंबंधित जोखीम कमी करण्यात हे उत्तमरित्या परिणाम देत आहेत.


 


मॅग्नेटो सेंट्रल एअर क्लीनर (एमसीएसी) आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट करण्यात आलेल्या थ्री-स्टेज ‘ट्रॅप अँड किल’ आणि फिल्टर-कम मॅग्नेटिक टेक्नोलॉजीसह येते. हे ९० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यक्षमतेसह पर्टिक्युलेट मॅटर आणि धोकादायक किटाणूंना नष्ट करते. नवी आवृत्ती यूव्हीजीआय तंत्रज्ञानाने संचलित असून ती ०.१ मायक्रॉनपर्यंत कणांना ट्रॅप करते. कोव्हिड-१९ विषाणूच्या आकारापेक्षा हा आकार खूप लहान आहे. देशातील प्रमुख कॉर्पोरेशन्स आणि बिझनेस हाऊसेस उदा. जिंदल ग्रुप, फ्रेंच इंटरनॅशनल स्कूल (दिल्ली), इफ्को, ईईएसएल आणि मेदांता हॉस्पिटलमध्ये लॉकडाउनदरम्यान सादर केलेले मॅग्नेटो समाधान आधीपासूनच वापरले जात आहेत.


 


एमसीएसी कमर्शिअल सेंट्रल एअर प्लोरीफिकेशन सिस्टिमला प्रिमियम ग्राहकांच्या गरजांनुसार कस्टमाइज करण्यात आले आहे. उदा. ताज समूहाचे हॉटेल आणि गोदरेज एअर रेसिडेंशिअल कॉम्प्लेक्स. येथे साथ येण्यापूर्वीच ही सिस्टिम इन्स्टॉल करण्यात आली होती. तसेच याच्या परिणामांचा अभ्यास करत इनडोअर एअर क्वालिटीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. हेल्दी इनडोअर एअर क्वालिटी के‌वळ धोकादायक विषाणूंपासून बचाव करत नाही तर माणसांची कार्यक्षमता वाढवते. आरोग्यासंबंधी अनेक जटिल समस्या कमी होतात आणि घरातील महागड्या संपत्तीचे संरक्षण करते. भारत एक तरुण देश आहे.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन