एकच तारीख - एकच वेळ : श्रद्धांजली आणि या दुर्दैवी घटनेचा "मुक निषेध

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳


 


*एकच तारीख - एकच वेळ : श्रद्धांजली आणि या दुर्दैवी घटनेचा "मुक निषेध " कार्यक्रम*


 


---------------------------------------------


 


*13 जुलै 2016 - महाराष्ट्राच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस ! याच दिवशी कोपर्डीमध्ये एका निष्पाप कोवळ्या फुलाला कुस्करलं गेलंय, कसायाप्रमाणे हाल हाल करून चिमुरडीची हत्या केली केली ! न्यायासाठी लाखोंचे मोर्चे काढुनही ती चिमुकली आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे, आणि गिधाडे मोकाट आहेत !*


 


यातुनच उडालेल्या भडक्यातुन पुढे आलेल्या मराठा *आरक्षणाच्या मागणीसाठी 42 मराठा बांधवांनी समाजासाठी आत्मबलिदान दिलं ती कुटुंबं अजुनही मदतीशिवाय वा-यावर आहेत !*


 


13 जुलैच्या निमीत्ताने प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये पण #कोरोनाच्या #संकटामुळे #आपापल्या #घरात श्रद्धांजली वाहणार आहोत पण *श्रद्धांजली वाहत असताना वरील दोन्ही गोष्टींचा निषेध म्हणुन सर्व मराठा बांधवांनी 13 जुलै रोजी आपल्या दंडावर काळी रेबीन बांधुया* आणि अशा दुर्दैवी घटनेचा"मुक निषेध" करूया !!


 


हा कार्यक्रम *एकाच दिवशी आणि एकाच वेळी* संपुर्ण महाराष्ट्रात घ्यायचा आहे :


 


*दिनांक :13 जुलै 2020


*वेळ :सायं 7 ते 8 या वेळेत


 


सर्व स्थानिक मराठा बांधवांनी आजपासुनच तयारीला लागुया.


 


*विनंती : हा मेसेज महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा बांधवापर्यंत पोहचवुया !


*!! जय जिजाऊ, जय शिवराय !!*


*!! सकल मराठा समाज, महाराष्ट्र !!*


⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳