तारक मेहता ची 12 वर्ष *अडीच वर्षं दयाभाभी या व्यक्तिरेखेशिवाय प्रेक्षकांनी कार्यक्रम स्वीकारला आहे.*त्यामुळे पुन्हा यायचे का??? नाही दयाभाभी नी ठरवायचे...... *निर्माते मा. असीत मोदी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


अडीच वर्षं दयाभाभी या व्यक्तिरेखेशिवाय प्रेक्षकांनी कार्यक्रम स्वीकारला आहे.


 


तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये दिशा वाकाणीनी यायचं की नाही हा त्यांचा निर्णय आहे असं मत तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असीत मोदी यांनी व्यक्त केलं आहे. (इन्स्टाग्रामवरून साभार)


 


 


दिशा वाकाणीनी यायचं की नाही हा त्यांचा निर्णय आहे असं मत तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असीत मोदी यांनी व्यक्त केलं आहे. (इन्स्टाग्रामवरून साभार)


 


हिंदी टीव्ही मालिकांमध्ये नवनवे विक्रम करणारी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका आज २८ जुलैला आपली १२ वर्षे म्हणजे एक तप पूर्ण करत आहे. त्यानिमित्त सेट्सवर सेलिब्रेशन होणार आहे पण साधेपणानी. या मालिकेचे निर्माते असीतकुमार मोदी यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना अनेक गोष्टींचा खुलासा केला. तारक मेहता का उल्टा चष्माची कथा जेठालाल गडा या गुजराती व्यापाऱ्याच्या आणि तो राहत असलेल्या गोकुळधाम सोसायटीतील कुटुंबियांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित आहे.


 


जेठालालच्या आयुष्यात दररोज काहीतरी अडचण येते आणि ती सोडवण्यासाठी सगळी सोसायटी धावून येते. या सगळ्या प्रकारात हास्याचे तुषार उधळले जातात. त्यामुळेच सलग १२ वर्षे या मालिकेनी प्रसिद्धीचे उच्चांक गाठले आहेत. यातील कथानक, कलाकारांचा अभिनय, व्यक्तिरेखा सगळंच सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं असल्यामुळे ते प्रेक्षकांना अधिक भावतं.


 


 


मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे जेठालालची पत्नी दयाभाभी. ही भूमिका दिशा वाकानी साकारत होत्या पण गेल्या अडीच वर्षांपासून त्या मालिकेत दिसत नाहीत. दया भाभी, त्यांची बोलण्याची पद्धत, गरबा करण्याची त्यांची हौस यामुळे या व्यक्तिरेखेलाही खूप प्रसिद्धी मिळाली आहे. त्या परत कधी येणार याबाबत विचारलं असता असीत मोदींनी स्पष्टता दिली.


 


दयाभाभीबद्दल बोलताना असीत म्हणाले, ‘मालिकेत परत यायचं की नाही हा त्यांचा निर्णय आहे. पण गेली अडीच वर्षं दयाभाभी या व्यक्तिरेखेशिवाय प्रेक्षकांनी कार्यक्रम स्वीकारला आहे. दयाभाभी नाहीत म्हणून कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत कुठलीही कमी झालेली नाही. त्यामुळे पुन्हा यायचं की नाही हे दिशा यांनी ठरवायचं आहे त्या आल्या नाहीत तरीही कार्यक्रम सुरूच राहील.’


 


लॉकडाऊनच्या काळात इतर मालिकांच्या तुलनेत तारक मेहता ही मालिका सुरू व्हायला उशीर झाला. इतर मालिका १३ जुलैपासून सुरू झाल्या. तारक मेहता का उल्टा चष्मा एक आठवडा उशिरा सुरू झाली त्याबद्दल असीत म्हणाले,‘ आमच्या मालिकेत २२ प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. त्यांना एकत्र करून मालिकेचं शूटिंग सुरू करायला वेळ लागला.’


Popular posts
संग्राम शेवाळे यांनी विद्यार्थी प्रश्नांसाठी शिष्टमंडळसोबत मा.राज्यपाल महोदय यांची भेट घेतली
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
*एक वेळ अवश्य भेट द्या* *मराठा वधू-वर* *सूचक केंद्र* *बालिंगे, गगनबावडा रोड, कोल्हापूर ४१६०१०*
Image
महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळाचा विस्तार
Image
पुण्यातून कलाकार आणि विविध संघटनेची मागणी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना च आमदार या पदावर नियुक्ती करण्यात यावी
Image