पुण्यात' पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या 100% निकालाची परंपरा कायम.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


'


 विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा विज्ञान कला आणि वाणिज्य या तिन्ही यांचा निकाल 100% लागला असून विज्ञान विभागातील(शाखेत) 76.46% गुण मिळून श्रीपाल चौधरी तर कला शाखेत 68.00% गुण मिळवून पंतुला मानसा व वाणिज्य शाखेतील तरुणादेवी चौधरी 83.50% गुण मिळवून प्रथम आले. तसेच विज्ञान शाखेतील तन्मय महाडिक व अशोक चौधरी 68.61% गुण मिळवून द्वितीय तर कुणाल पवार 68.00% गुण मिळवून तृतीय आला. तसेच कला शाखेतून निर्विती शर्मा व वंशिता सरगडे तर वाणिज्य शाखेतील प्रमिला भायाळ व आर्यन नायर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले. 


 पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार अध्यक्ष श्री हुलगेश चलवादी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास उपाध्यक्ष रेणुका चलवादी, प्राचार्य स्मिता लोंढे ,उपप्राचार्य विजय गायकवाड व्यवस्थापिका सायली शिंदे आदी उपस्थित होते


  कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेऊन सुरक्षित अंतर व संपूर्ण काळजी घेऊन हा छोटेखानी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी मोहिते, नितीन थोरात, शामल मोहिते, रुची सहस्त्रबुद्धे ,रेखा धोत्रे ,प्रीती मोरे, ऋतुजा मोरे ,प्रकाश दळवी शिक्षकांनी सहकार्य केले