२७ वर्षांची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी अनोखा उपक्रम !

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


२७ वर्षांची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी अनोखा उपक्रम !


 


पारोळा - कोरोनामुळे जाहीर बक्षिस समारंभ करता येत नसल्याने तालुका स्तरीय बक्षिस समारंभाची २७ वर्षांची परंपरा खंडित होऊ न देता येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी इयत्ता १२ वी मार्च २०२० परीक्षेत प्रत्येक उच्च माध्यमिक विद्यालयात प्रथम आलेल्या २७ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक गुण मिळालेला विद्यार्थी चि कलश योगेश सोनजे ( ८८.९२ टक्के गुण )यास प्रातिनिधिक स्वरूपात बक्षीस म्हणून १५० रुपये रोख गौरव पत्र एक पुस्तक व गुलाब पुष्प देऊन नेत्ररोग तज्ज्ञ डॉ सौ राजकुमारी सुरैश जैन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .


तालुक्यातील उर्वरीत २६ विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी सवडीनुसार १५ दिवसांत केव्हांही घरी येऊन आपलं बक्षीस व गौरव पत्र न्यावे अशी नम्र सुचना आयोजक यांनी भ्रमणध्वनी द्वारा संपर्क साधून केली आहे 


गुणी जन सत्कार म्हणून डॉ सौ राजकुमारी जैन यांना पुणे येथे राज्य स्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल स. ध.भावसार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार केला या घरगुती सोहळ्यात पती डॉ सुरेश जैन सुपुत्र डॉ राहुल व डॉ सौ ललिता जैन यांची उपस्थिती होती.


भावसार सर हे एक उपक्रमशील निवृत्त शिक्षक असून त्यांना नुकतेच कोरोना योद्धा म्हणून राज्य भरातून तब्बल १६ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे आदर्श शिक्षक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व समाज भूषण सेवा रत्न इ.१६ पुरस्कार त्यांना मिळाले असून एक उपक्रमशील सेवाभावी व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image