फेडच्या निर्णयापूर्वी बाजारपेठेत अस्थिरता, सेन्सेक्स आणि निफ्टी ०.७ टक्क्यांनी वाढले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


मुंबई, १० जून २०२०: बुधवारी, दिवसभरातील अस्थिरतेच्या सत्रानंतर भारतीय बाजार उच्च पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने २९०.३६ अकांची तसेच ०.८६ टक्क्यांची वृद्धी घेतली. निफ्टीदेखील सत्रात ०.६९ टक्क्यांनी वधारला. बँकिंग, रिअॅलिटी आणि मिडकॅप स्टॉक्समध्ये सकारात्मक गती दिसून आली तर ऑटो, मेटल आणि तेल -वायूच्या स्टॉकमध्ये तणाव दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.


 


फेडच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत भारतीय बँकिंग आणि वित्तीय स्टॉक्सने आज सकारात्मक स्थिती अनुभवली. निफ्टी बँकेने १.८१% ची वृद्धी घेतली तर निफ्टी पीएसयू हा आजच्या मार्केटमधील प्रमुख चालक ठरला. इंडेक्सने ३.५ टक्क्यांची वृद्धी घेत शून्य टक्के घसरण अनुभवली. पीएनबीने निफ्टी पीएसयूच्या लाभाचे नेतृत्व केले. हे स्टॉक्स ६.४५ टक्क्यांनी वाढले. पीएनबीच्या ८.३६ कोटींपेक्षा जास्त शेअर्सनी आजच्या सत्रात आपापसात देवाणघेवाण केली. त्यानंतर या रॅलीत युको बँक, आयओबी आणि इंडियन बँकेने अनुक्रमे ६.२७%, ६.०३% आणि ५.५२% ची वृद्धी घेतली. आरबीएल बँक ही आज १९.९९ टक्क्यांच्या वृद्धीसह एनएसईमधील सर्वाधिक लाभदायी ठरली.


 


दिवसभराच्या ट्रेडमध्ये सेन्सेक्समधील नफ्याचे नेतृत्व इंडसइंड बँकेने ७.९३% वृद्धीसह केले. त्यानंतर केटक बँक, आरआयएल, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेने अनुक्रमे २.३४%, २.१७% आणि १.८८ % ची वाढ दर्शवली. ऑटो स्टॉक्समध्ये हिरो मोटोकॉर्प आणि बजाज ऑटोने तणाव सहन करत अनुक्रमे ३.९२ % आणि २.५८%ची घट अनुभवली. टाटा स्टील आणि ओएनजीसीदेखील २.४४% आणि २ % नी घसरले. निफ्टीमध्ये हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि श्री सिमेंट हे इंडसइंड बँकेसोबतच टॉप गेनर्समध्ये समाविष्ट होते.


 


आज, निफ्टी ऑटोनी १.१४% ची घसरण घेतली. यातील ६ स्टॉक्स नफ्यात तर १० स्टॉक्स तोट्यात दिसून आले. अशोक लेलँडला ३.८४.% नफा होऊनही २ ते ४ % पर्यंत तोटा झाला. यात मदरसन सुमी, हिरो मोटोकॉर्प आणि बॉश यांचा समावेश होता. एसअँडपी बीएसई ऑटो इंडेक्सवर बाळकृष्ण इंडस्ट्रीजनेदेखील अशोक लेलँडसोबत वृद्धी करत २.०१% चा नफा कमावला.


 


रिअॅलिटी स्टॉक्सदेखील आज बीएसई आणि एनएसई या दोहोंवर प्रकाशात होते. या निर्देशांकात १.५ % नी वृद्धी झाली. निफ्टी रिअॅलिटीपैकी केवळ दोनच स्टॉक्सनी घसरण अनुभवली. यात सनटेक रिअॅलिटी आणि गोदरेज प्रॉपर्टीज यांचा समावेश झाला. त्यांनी अनुक्रमे १.९४% आणि ०.७८% ची घसरण अनुभवली. बहुतांश नफा हा २ %च्या पुढे होता. प्रेस्टीज इस्टेट आणि ओबेरॉय रिअॅलिटी हे अनुक्रमे ५.०८% आणि ४.१२% च्या वृद्धी टॉप परफॉर्मन्स म्हणून उदयास आले. बीएसई रिअॅलिटी इंडेक्सवर सोभा स्टॉक्सदेखील लाल रंगात दिसून आले. दुसरीकडे, एचडीआयएलची अप्पर सर्किट धाव सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर ४.७९ टक्क्यांनी वृद्धीमध्ये रुपांतरीत झाली.