*देशाचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार साहेब,मा.प्रदेशांध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील साहेब व उपमुख्य मंत्री ना.अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार,सोलापूर जिल्ह्यांमध्ये *"राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान राबविणे बाबत*....... *उमेश पाटील कार्यकारी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सोलापूर जिल्हा*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


*विषय :* *देशाचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार साहेब,मा.प्रदेशांध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील साहेब व उपमुख्य मंत्री ना.अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार,सोलापूर जिल्ह्यांमध्ये *"राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान राबविणे बाबत*...


 


नमस्कार!


 


महोदय,


 


मा.प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील साहेबांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष,कार्यकारी जिल्हाध्यक्ष,युवक जिल्हाध्यक्ष,महिला जिल्हाध्यक्ष,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष,युवती जिल्हाध्यक्ष, ओ.बी.सी.जिल्हाध्यक्ष,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या इतर सेलच्या अध्यक्षांना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संबोधित करताना,राज्यव्यापी "राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान राबविण्याची घोषणा केली आहे.


 


अभियानाचे स्वरूप:


 


या अभियाना अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यांतील गाव स्तरापर्यंतच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून http://bit.ly/RashtravadiPakshAbhipraay या ऑनलाईन लिंकद्वारे,थेट मोबाईल फोनवरून ऑनलाईन फिडबॅक फॉर्म भरून घेतला जाणार आहे.ऑनलाईन फॉर्म भरणा-या कार्यकर्त्याने, सदर फॉर्ममध्ये विचारलेली माहीती (कुठलाही पर्याय रिक्त न ठेवता) टाईप करून सबमिट करावयाची आहे.


 


अभियानाचे उद्दिष्ट:


 


1. तालुका निहाय सार्वजनिक प्रश्न समजून घेणे


 


2. तालुका निहाय संघटनात्मक कामाची सत्य परिस्थिती जाणून घेणे


 


3. कोविड-१९ चे संक्रमण नियंत्रित करण्यासाठी काही कल्पक व उपक्रमशिल सूचना जाणून घेणे


 


4. तालुक्यातील प्रलंबित जलसिंचन व इतर विकास कामांची माहिती घेणे


 


5. कार्यकर्त्याच्या अभिप्रायाच्या आधारे भविष्यकाळातील संघटनात्मक सुधारणा करणे तसेच तालुका निहाय विकास कामांचा अजेंडा निश्चित करणे.


 


अभियानाची अंमलबजावणी:


 


1. सदर अभियान "ऑनलाईन पद्धतीने फिडबॅक फॉर्म भरून देणे या स्वरूपाचे असल्याने सर्वात प्रथम पक्षाच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांपर्यंत सदर फिडबॅक फॉर्मची ऑनलाईन लिंक http://bit.ly/RashtravadiPakshAbhipraay मेसेज द्वारे पाठवली जाईल


 


2. सदर लिंक कॉपी पेस्ट करून प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्याने त्याच्या किमान १०० सहका-यांना पाठवायची आहे व त्या १०० कार्यकत्यांनी सदर ऑनलाईन फिडबॅक फॉर्म भरूम सबमिट केला असल्याची खात्री करावयाची आहे.


 


3. सदर अभियानाची सविस्तर माहिती देण्याकरिता तथा अभियानाच्या प्रभावी अंमबजावणीसाठी थेट जि.प.स्तरावरील कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष बैठक घेऊन ( सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून) उपस्थित कार्यकत्यांकडून राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे तथा प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.


 


यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकारी जिल्हाध्यक्ष या नात्याने मी स्वतः संपूर्ण जिल्हााचा जिल्हापरिषद गट निहाय दौरा करणार आहे.या दौऱ्यामध्ये माझ्या सोबत युवक जिल्हाध्यक्ष,महिला जिल्हाध्यक्ष,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष, युवती जिल्हाध्यक्ष, ओ.बी.सी.जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष.सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या इतर सेलच्या अध्यक्षांना सहभागी व्हावयाचे आहे.पक्षाच्या तालुका अध्यक्षांना त्यांच्या तालुक्याची दौऱ्याची तारीख कळवली जाईल,त्याप्रमाणे तालुका अध्यक्षांनी ऐका दिवसात 6 ते 7 जिल्हा परिषद गटांच्या दौऱ्याचे नियोजन तयार करावयाचे आहे.


 


युवक महिला व इतर सेलच्या जिल्हाध्यक्षांनी आपापल्या तालुका अध्यक्षांना देखील सूचना करून वरील प्रमाणे जि.प. गट निहाय बैठकांना आपापल्या सेलचे कार्यकर्ते उपस्थित राहतील याची काळजी घ्यावयाची आहे.


 


4. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातून कमीतकमी ५००० ऑनलाईन फिडबॅक फॉर्म भरून प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.


 


तरी सर्व प्रमुख नेते व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, भविष्यकाळातील आपापल्या तालुक्याचे विकासाचे थोरण ठरविण्यासाठी तसेच संघटनात्मक बांधणीसाठी मूलगामी मैलाचा दगड ठरणारे हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराका्ा


 


करावी ही विनंती...


 


धन्यवाद,


 


आपला विश्वासू


 


उमेश पाटील कार्यकारी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सोलापूर जिल्हा


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image