बाजारात किरकोळ घसरण; निफ्टी १६.४० तर सेन्सेक्स २६.८८ अंकांनी घसरला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मुंबई, २५ जून २०२०: आजच्या व्यापारी सत्रात बाजाराने काहीशी घसरण अनुभवली. निफ्टी ०.१६ किंवा १६.४० अंकांनी घसरण घेत १०,२८८.९० अंकांवर थांबला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.०८% किंवा २६.८८ अंकांनी घसरत ३४,८४२ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास ११३० शेअर्सचे मूल्य घसरले, १४७७ शेअर्सनी नफा अनुभवला, तर १५८ शेअर्स स्थिर राहिल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.


 


आयटीसी (५.५५%). हिरो मोटोकॉर्प (२.८६%), बजाज फायनान्स (१.८९%), कोटक महिंद्रा बँक (१.७३%) आणि हिंदुस्तान युनिलिव्हर (१.२६%) हे बाजारातील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे एशियन पेंट्स (३.१३%), हिंडाल्को इंडस्ट्रिज (2.34%), आयओसी (२.१२%), अदानी पोर्ट्स (१.८०%) आणि श्री सिमेंट्स (१.८५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.


 


एफएमसीजी आणि फार्मा वगळता इतर सेक्टर्सनी लाल रंगात कामगिरी केली. बीएसई मिडकॅप ०.६२% नी वाढले तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.७६% ची वृद्धी दिसून आली.


 


भारतीय रुपयाने आजच्या व्यापारी सत्रात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७५.७५ रुपये अशा काहीशा निचांकी स्थानावर व्यापार केला. कोव्हिड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढूनही आजच्या व्यापारी सत्रात सुरक्षित मालमत्ता खरेदीकडे कल दिसून आल्याने सोन्याचे दर स्थिर राहिले.


 


जगात सर्वच ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने युरोपियन बाजाराने संमिश्र प्रतिसाद दर्शवला. तसेच जागतिक बाजारानेही घसरण अनुभवली. एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.०३% नी वाढले तर एफटीएसईचे ०.१९% नी घसरले. नॅसडॅकचे शेअर्स २.१९% नी घसरले. निक्केई २२५ चे १.२२% नी घसरले तर हँग सेंगचे शेअर्सदेखील ०.५० टक्क्यांनी खाली आले.