आझम कॅम्पस मशिदीत दर शुक्रवारी नमाज पठणाचे'फेसबुक लाईव्ह'द्वारे थेट प्रक्षेपण*  .................................... *मशीदीत न जाता घरी नमाज पठण शक्य

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*


 


पुणे :


 


  कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत शुक्रवार (जुम्मा ) नमाजचे'फेसबुक लाईव्ह' द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे.मशीदीत न जाता घरी मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शना खाली नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले.अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही,फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते.दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो.


आझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली.२९ मे च्या शुक्रवार पासून या उपक्रमाला सुरुवात झाली.   


एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते.कोरोना संसर्गचा  धोका लक्षात घेऊन  शुक्रवारी मशिदीत जाता येत  नाही. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते.प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात. पुढील लिंक द्वारे या नमाज पठणात सहभागी होता येते.  https://www.facebook.com/azamcampus1922


 


याआधी रमजान ईद च्या दिवशी देखील सकाळी ८ वाजता आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद यांनी ईद साठीचे नमाज पठण केले.नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे सुरुवातीला नमाज पठण कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले.मग,ईद -उल -फित्र ची नमाज अदा करण्यात आली.त्यानंतर थोडक्यात खुतबा पढण्यात आला आणि दुआ सांगण्यात आली.पेश इमाम यांच्या पाठोपाठ हे लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या बांधवानी घरी  नमाज अदा केली. सुमारे ५ हजार बांधवांनी हे प्रक्षेपण सकाळच्या वेळी पाहिले होते.आझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली होती.  


-................................................


 


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कूल आयोजित क्रीडा करंडक स्पर्धेत 'सर सय्यद अहमद हाऊस' विजयी*                                                                                    
Image
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या