पु.ल. देशपांडे उदयान एकूण १० एकर परिसरामध्ये विस्तारले असून सदर उदयानात पु.ल. देशपांडे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा..... सूचक - (सौ सरस्वती राजाभाऊ शेंगे) उपमहापौर, पुणे

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


पुरुषोतम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल (जन्म मुबई. ८ नोव्हेंबर मृत्यू पुणे, जून २०००) व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. कलाकार


 


लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार,


 


सन १९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम् दूधभात' आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गूळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे होते. सन १९३७ पासून पुलंचा नभोवाणीशी संबंध आला होता. सन १९५५ मध्ये पु.ल.देशपांडे 'आकाशवाणीत (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. सन १९५६-५७ मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईनी गडकरी दर्शन' नावाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातूनच बटाट्याची चाळ या जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली,


 


सन १९५८ मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. सन १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या दुतगतीतही तबला वाजवून पुलनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.


 


पुलंचे कार्य व अष्टपैलू व्यक्तिमत्व पाहला पु.ल. देशपांडे यांचे नाव पुण्यातील सिंहगड रोड वर असलेले उदयानास दिलेले आहे. याची रचना जपानी उद्यानपदधतीची आहे. प्रचलित सर्व प्रकारच्या उद्यान शैलीत जपानी उद्यानशैली ही सुंदर आणि अति विकसित उदयान शैली आहे, असे मानले जाते.


 


जपानी उट्याने त्यांच्या अभिरुचीपूर्ण नैसर्गिकता यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहेत. है जपान मधील ओकोयामा शहरातील ३०० वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उदयानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील एक उद्यान आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकाना पहावयास मिळावे अशी या उदयानाची रचना करण्यात आली आहे या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचे झरे टेकड्या या सर्वाचा अनुभव घेता येतो कॉफी, भात आणि अशा विविध वैशिट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या शिवाय तुळस आणि त्याच्या सारख्या अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. गुलाब, तगरी पासून विविध शोभेची फुले या उद्यानाचे सांदर्य खुलवतात. पाण्याचे झरे आणि विविध फुले यामुळे तन्हेतन्हेचे पक्षी येथे पाणी प्यायला आणि विसाव्याला येतात. पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक छायाचित्रकारांचे पु.ल. देशपांडे उद्यान हे एक आवडते ठिकाण आहे.


 


पु.ल. देशपांडे उदयान एकूण १० एकर परिसरामध्ये विस्तारले असून सदर उदयानात पु.ल. देशपांडे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा.


 


 


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image