आझम आय.टी.अकॅडमी च्या सायबर सेफ्टी जागृती मोहीमेत १२९१ जणांचे प्रशिक्षण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


प्रेस नोट 


 


*


 


पुणे :


 


  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम आय.टी.अकॅडमी तर्फे  सायबर सेफ्टी जागृती ही ऑन लाईन  मोहीम   आयोजित करण्यात आली होती.जागृती मोहीमेत १२९१ जणांचे प्रशिक्षण करण्यात आले.५ जून पासून रोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत हे प्रशिक्षण पार पडले. 


 


सायबर सुरक्षा, पासवर्ड सुरक्षा, संगणक सुरक्षा, सायबर स्कॅम, मोबाईल सुरक्षा , सायबर बुलींग या विषयी माहिती देण्यात आली.


 


तंत्रज्ञान तज्ज्ञ तन्वीर इनामदार यांनी मार्गदर्शन केले. सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली . 


---------------------