कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउन स्थितीमध्ये गरजू व्यक्तींना प्रशांत वाघमारे व सुरेंद्र चिंतल यांच्याकडून स्वतःच्या बँकेतील शिल्लक निधी आणि एफ.डी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


तोडून सहकार्य


 


           कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या स्थितीमुळे हातावरील पोट असणारे मजूर, कर्मचारी,पगारदार,छोटे व्यवसायिक,विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत आहेत.


        याची जाण ठेवून पुणे शहरातील वाघोली,धानोरी, विश्रांतवाडी,लोहगाव,कळस, कोथरूड,स्टेशन परिसरातील मजूर,ससून रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक,स्टेशन परिसरातून श्रमिक रेल्वेने जाणारी मजूर या सर्वांसाठी प्रशांत वाघमारे आणि सुरेंद्र चिंतल हे सातत्याने मदत करत देवदूत ठरले आहेत कारण त्यांनी स्वतःच्या बँकेतील शिल्लक असलेला सर्व निधी तसेच स्वतःची बँकेतील असलेली एफ.डी तोडून आलेल्या रकमेने ते गेले तीन महिने झाले अन्नदान, सुखा शिधा वस्तू व आरोग्य सुविधेचे वाटप करीत आहे.


    प्रशांत वाघमारे व सुरेंद्र चिंतल मित्रपरिवार हे गेले तीन महिने सातत्याने पुणे स्टेशनहुन परगावी,परराज्यात श्रमिक रेल्वेने जाणाऱ्या मजूर प्रवाशांना अन्नदान,महिलांना सॅनिटरी पॅड, रेल्वेतील लहान मुलांना पोषक खाद्य देत आहेत.ससून रुग्णालय मध्ये सध्या रुग्णांची संख्या भरपूर वाढली असून रुग्णां बरोबर असणाऱ्या नातेवाईकांचे जेवणा विना हाल होऊ नये याकरिता त्यांना देखील सातत्यानेअन्नाचे फुड पॅकेट देत आहेत.


     प्रशांत वाघमारे आणि सुरेंद्र चिंतल यांनी शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत रक्तदान शिबिर घेऊन हे रक्त गरजूंपर्यंत पोहोचवलेले आहे.त्यांचे रक्तदान शिबिर सुरू असताना त्यांना बुधरानी रुग्णालयातून कॅन्सरग्रस्त मुलीस रक्ताची गरज असल्याचा फोन आला यावर त्यांनी त्वरित जाऊन त्या मुलीस रक्तदान केले.


      त्यांनी कोरेगाव पार्क येथील संत गाडगेबाबा वसाहत बरोबरच विविध झोपडपट्ट्यांमध्ये प्रत्येकी 300 ते 400 गरजू मजूर परिवारांना सुखा शीधा वस्तूंचे किटचे वाटप केले आहे. या किटमध्ये पाच किलो गहू,पाच किलो तांदूळ,दोन किलो साखर, दोन किलो तूर डाळ,पावशेर चहा पावडर,तेलाचे पाकीट,हळद, मीठ,मिरची,मसाला आणि मुरमुऱ्यांचे पाकीट यांचा समावेश आहे याबरोबरच झोपडपट्टीतील लहान मुलांना अत्यावश्यक असलेले पोषक चिप्स चे सुद्धा त्यांच्याकडून वाटप करण्यात येत आहे.


      विश्रांतवाडी पोलीस चौकी समोरील कोरोणटाईन सेंटर मधील कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्लोज आणि आरोग्य साहित्य त्यांनी दिले आहेत.


        कोरोणाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय निकड तसेच अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेल्या ॲम्बुलन्स आणि पी.एम.टी.च्या ड्रायव्हरना प्रशांत वाघमारे व सुरेंद्र चिंतल सातत्याने अन्नाचे फुड पॅकेट देत आहेत.


       अशा प्रकारे गेल्या तीन महिन्यांपासून प्रशांत वाघमारे सुरेंद्र चिंतल मित्रपरिवार दररोज स्वतःच्या पैशाने आपला बहुमूल्य वेळ देऊन अन्नदान,आरोग्यसेवा देऊन अनमोल असे कोरोना योद्धे ठरले आहेत.


       स्वतःचे बँकेतील सर्व पैसे व एफ.डी तोडून संकटकाळी समाजाकरिता अहोरात्र पळणारे प्रशांत वाघमारे आणि सुरेंद्र चिंतल यांनी समाज कार्याचा उत्तम आदर्श निर्माण केलेला आहे.या कार्यासाठी त्यांना विक्रम मांगुळकर,मनोज मेहता,परशुराम दोडनावल,अविनाश खरात यांनी विशेष सहकार्य करीत आहेत.