भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


!


 


पुणे महापालिकेच्या माध्यमातून साकारत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेची आज विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.


 


वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली जागा, तूर्त उपलब्ध असलेली जागा, कर्मचारी निवासाचे स्थलांतर आणि अतिक्रमण अशा विविध मुद्द्यांवर प्रत्यक्ष पाहणी करुन चर्चा केली. कमीत कमी कालावधीत सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील असून सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवणार आहे.


 


यावेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आरोग्य प्रमुख


 डॉ. रामचंद्र हंकारे, उपायुक्त राजेंद्र मुठे,विजय दहिभाते, अविनाश सकंपाळ, सुनिल इंदलकर, माधव जगताप शिवाजी लंके,अंजली साबणे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय सल्लागार कंपनी अधिकारी व अनेक मनपा अधिकारी उपस्थित होते.